“मी पुन्हा चालणार”
सरकारी अधिकारी (एमपीएससी/युपीएससी) बनण्याचे स्वप्न असलेली सायली परीक्षेच्या तयारीत असतानाच क्षणार्धात तिचे भविष्य अंधारमय झाले.
20 ऑक्टोबर, 2016 रोजी युपीएससीच्या परीक्षेच्या तयारी निमित्ताने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे राहणारी सायली ढमढेरे (वय 22 वर्षे) कल्याण येथे रेल्वे ट्रेन मध्ये चढताना संतुलन गमावले. पळभरात दोन्ही पायावरून रेल्वेचे चाक फिरले. सायलीचे भविष्य/जीवनही तसेच फिरले.
या दिवाळीला सायलीच्या वडिलांचा शुभेच्छा संदेश आला –
“सायली आता स्वत:च्या पायावर उभी आहे. पुन्हा एकदा युपीएससीची तयारी सुरु आहे.”
आपल्या सहकार्य व शुभेच्छांमुळे सायली आता पुन्हा धावणार.
कथा सायलीची -
- बीएससी परिक्षेत 78% मार्काने पास
- एमपीएससी/युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु
- पात्रता परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी कल्याणला आपल्या नातेवाईकांकडे आली.
- महाराष्ट्र सरकारच्या State Institute for Administrative Careers परीक्षेसाठी जुन्नरहून मुंबई येथे आली.
SIAC चे हॉल तिकीट
- परीक्षा संपून 20 ऑक्टोबर 2016 रोजी सायली कल्याणहून इंद्रायणी एक्सप्रेसनी पुण्याला जाण्यासाठी स्टेशनवर पोहचली.
- कल्याण प्लॅटफॉर्मवर इंद्रायणी एक्सप्रेस मध्ये चढतानाच तिचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळाच्या पोकळीत पडली.
- रेल्वेचे चाक रुळावर तसेच सायलीच्या पायावरून फिरले, दोन्ही पाय कापले गेले सायली बेशुद्ध पडली.
Midday पेपरची बातमी
रेल्वे स्टेशनवरील पोलीसांनी, स्टेशन अधिकाऱ्यांनी व प्रवाशांनी सायलीला बाहेर काढले, कल्याण येथील बाई रुक्मिणीबाई सरकारी हॉस्पिटल मध्ये नेले. परंतु पुढील उपचारांसाठी तिला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.
- मिडिया, टीव्ही चॅनल्स व पत्रकार यांनी 22 वर्षीय सायलीच्या भविष्यासंबंधी व अपघातासंबंधी बातम्या दिल्या.
- मला (किरीट सोमैया) बातमी कळताच मी ताबडतोब ज्युपिटर हॉस्पिटल येथे धावलो. सायलीचे नातेवाईक, वडील, भाऊ..... ज्युपिटरचे डॉक्टर यांच्याशी चर्चा केली.
ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये सायलीची भेट
- सायलीला स्वत:च्या पायावर उभ करण्याचा संकल्प आम्ही केला.
ज्युपिटर हॉस्पिटल येथील उपचार
- 22 वर्षाच्या तरुणीचे अचानक दोन्ही पाय कापले जाण्यानी सायली व तिच्या परिवारावर शारीरिक तथा मानसिक दडपण आले, शारीरिक अपंगत्वा सोबतच मानसिक अपंगत्वाची जाणीव झाली.
- आम्ही सायलीशी सतत संपर्क व समुपदेशन करून मानसिक आधार देण्याचे व तिचा आत्मविश्वास अजिबात ढळू न देण्याचे ठरविले.
- असे अन्यही रेल्वे अपघातात ज्यांनी हात पाय गमावलेले प्रवासी, तरुण यांच्यावर आम्ही युवक प्रतिष्ठानच्या Limbs for Life या उपक्रमांतर्गत अत्यंत आधुनिक कृत्रिम अवयव देऊन त्यांचावर उपचार करून त्यांना परत उभे केले. अशा काही लोकांबरोबर सायलीची भेट घालून दिली.
- डॉ. रोशन शेख दोन्ही पाय अशाच पद्धतीने मुंबई येथील रेल्वे अपघातात गेले होते. चांगल्या कंपनीचे दोन कृत्रिम पाय रोशनला मिळाले, ट्रीटमेंट मिळाली, रोशन स्वत:च्या पायावर उभी राहिली, एमबीबीएस डॉक्टरही झाली. रोशननी सायलीचे मनोधैर्य उंचावले.
- नवनाथ यमगर, वय 22 वर्षे अंधेरी येथे झालेल्या रेल्वे अपघातात उजवा पाय व उजवा हात गमावला त्यांच्यावर उपचार करून चांगले ऑटोबॉक कंपनीचे एक कृत्रिम पाय आणि हात देऊन त्याला नव संजीवनी दिली आज तो चांगला पगार मिळवत आहे.
- मोनिका मोरे विद्यार्थिनी असताना घाटकोपर येथील रेल्वे दुर्घटनेत दोन्ही हात मनगटापासून गमावले, तिलाही कृत्रिम हात दिले, सध्या ती चांगली नोकरी करत आहे.
- तन्वीर शेख, वय 22 वर्षे, 2014 ला कुर्ला येथे रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले, त्याला ही अशाप्रकारची मदत केली. आज तो सायन येथे मोबईलचे दुकान यशस्वीपणे चालवत आहे.
हॉस्पिटलचा अवाढव्य खर्च
- सायलीचा अपघात फार भयानक होता. दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया नंतर जंतूसंसर्ग (Septic) होणार नाही त्याची काळजी.
- रुपये 28 लाखांचा हॉस्पिटलचा अपेक्षित खर्च
- ज्युपिटर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजय ठक्कर व डॉ. अंकित ठक्कर यांच्याशी मी खर्चावर सवलत मिळण्यासाठी चर्चा केली. तसेच विभिन्न ट्रस्ट यांच्याकडून आर्थिक मदत मिळण्यासाठीचा संकल्प केला.
कुटुंबीयांनी आर्थिक मदतीसाठी केलेले आवाहन
- आमच्या युवक प्रतिष्ठान व अन्य विभिन्न ट्रस्ट देणगीदारांच्या सहाय्याने हा संकल्प पार पाडण्यात आला.
- युवक प्रतिष्ठान
- टाटा ट्रस्ट
- लोट्स ट्रस्ट
- सिद्धिविनायक ट्रस्ट
- विघ्नहर साखर कारखाना
- सायलीचे नातेवाईक व ग्रामस्थ
- श्री. सुधीर सावंत, श्री. अशोक साठे, डॉ. मराठे, श्री. राजेश गांगुर्डे, श्री. यतीश गुजराथी, श्री. यतीन खन्ना, श्री. रमेश तासकर यांचा आर्थिक मदतीत सिंहाचा वाटा
- डिसेंबर 2016 ला दोन महिन्यांच्या उपचारानंतर सायली जुन्नर येथील घरी गेली.
- दोन वर्षांचा पाठपुरावा (Follow Up Treatment/Surgery) नंतर उत्कृष्ट कृत्रिम पाय बसवण्यासाठी सायली सज्ज झाली.
- काही महिन्यांपूर्वी सायलीला चांगले दोन कृत्रिम पाय बसवण्यात आले.
- पुन्हा एकदा सायालीनी युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आहे.
- सायलीची जिद्द व निर्धार पुन्हा एकदा भविष्याचे भव्य स्वप्न पाहणार.
- आता सायली स्वत:च्या पायावर (कृत्रिम पाय) हळूहळू चालते.
आयुष्यात उंच उंच शिखर सर करण्यासाठी सायलीला शुभेच्छा.