9 वर्षांचा रेहान आणि 11 वर्षांचा इरफान यांना जन्मापासूनच ऐकायला येत नाही. सुरवातीचे दोन चार वर्षे पालकांना समजतही नव्हते की, आपल्या मुलांची काय समस्या आहे. त्यानंतर मोठ्या डॉक्टर ENT स्पेशालिस्टना दाखवल्यानंतर लक्षात येते. एवढ्यात मूल 5 वर्षाचे होते.
चार पाच वर्षाचे मूल झाल्यानंतर त्यांना कानाचे मशीन किंवा Cochlear Implant ऑपरेशन करण्यासंबंधीचे निर्णय होईपर्यंत मुले आणखीन मोठी होत असतात. आपल्या देशात बहिरेपणा संबंधी एवढी जागृती नाही. त्यामुळे अनेक मूले अश्या प्रकाराने ज्यांना ऐकायला येत नाही किंवा नीट ऐकायला येत नाही यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
अशाच पद्धतीने जेष्ठ नागरिकांचे एकदा का वय साठीच्या पलीकडे गेले की माणसांचे विविध अवयव घासले जातात. गुडघ्यांचे पण ऑपरेशन करावे लागतात, डोळांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे लागतात...... साधारणतः 4 जेष्ठ नागरिकांपैकी एकाला ऐकाला येत नसते. त्यांच्यासाठी ही आमचा एक प्रकल्प आहे. भारतीय जनता पार्टी व युवक प्रतिष्ठानतर्फे गेली 2 वर्षे “ऐका स्वाभिमानाने” या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिकांना 10,000 रुपयांचे कानाचे ऐकण्याचे मशीन अल्प अशा धर्मादाय दरात (500 रुपयात) देण्याची योजना सुरु आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांना अशी मशीन दिली.
परंतु ज्या लहान मुलांना जन्मापासूनच ऐकायला येत नाही त्यांना जी कानाची मशीन द्यावे लागते ते महागडे असते. 90% श्रवण दोष असणाऱ्या मुलांना जर कानाचे चांगले मशीन द्यायचे असेल तर दोन्ही कानाची मशीन म्हणजे काही वेळेला 2 लाख ते 4 लाख रुपये मार्केट प्राईझ असते.
आम्ही गेल्या दिवाळीपासून
“मला ही ऐकायचं आहे” लहान मुलांसाठी अशा प्रकारचे श्रेष्ठ, बेस्ट कानाचे मशीन देण्याची योजना/प्रकल्प सुरु केला. जगातली टॉप हिअरिंग एड कंपनी स्टार की यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहित मिश्रा यांच्याशी या विषयावर चर्चा केली. स्टार की कंपनीचे स्टार की फौंडेशन आणि युवक प्रतिष्ठान यांनी संयुक्त विषयात धर्मादाय/Charitable पद्धतीने काही लहान मुलांसाठी अश्या प्रकारचे महागडी मशीन धर्मादाय/अत्यंत अल्प दरात देण्यासंबंधीची चर्चा केली.
दोन चार लाखांचे मशीन हे पाच पंचवीस हजारात (पालकांचे नाममात्र योगदान/contribution) या मुलांना/पालकांना देऊन त्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा आमचा प्रयत्न/संकल्प आहे. देणगीदार या प्रकल्पासाठी युवक प्रतिष्ठान “मला ही ऐकायचं आहे” या प्रकल्पाला मदत करित आहेत.
कुर्ला, जरीमरी येथे राहणारे श्री. पप्पू खान हे आपल्या दोन्ही मुलांचे कुमार इरफान आणि रेहान यांचे अपंग प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी जे. जे. हॉस्पिटल मध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी आमच्या संस्थेचे “जेष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र वाटप” शिबिराचे पत्रक पाहिले व आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली आणि 10 ऑगस्ट 2019 रोजी ते दोन्ही मुलांना घेऊन आमच्या कार्यालयात आले.
तेव्हा त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या दोन्ही मुलांना जन्मापासूनच फार कमी ऐकू येते. मी त्यांना सांगितले आमच्या संस्थेतर्फे मिळणारी मशीन ही केवळ जेष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळे लहान मुलांना चालणार नाही. परंतु त्यांनी सांगितले 2018 मध्ये अली यावर जंग संस्थेमधून दोन्ही मुलांना मशीन मिळाल्या होत्या. परंतु त्यांना पाहिजे तसा परिणाम दिसत नव्हता.
पप्पू खान यांचा अर्ज
श्री. पप्पू खान हा आपल्या पत्नीसह रेहान आणि इरफानला घेऊन माझ्याकडे आला. त्या दोन्ही मुलांना बघून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. इरफानला थोड फार ‘लिप रिडिंग’ म्हणजेच आपण जे बोलतो ते आपल्या ओठांच्या हालचालीवरून समजण्याची कला/किमया येत होती. तुटक उत्तर देण, बोलण्याचाही तो प्रयत्न करित होता. धाकटा रेहान लिप रिडिंग शिकण्याच्या प्रयत्नात आहे.
दोन्ही मूलं व त्यांच्या आईवडीलांची जिद्द पाहून आम्ही संकल्प केला. या दोघांना कानाची मशीन मिळवून द्यायला हवी त्याच्यामुळे रेहान आणि इरफानच तर भवितव्य उज्ज्वल होणार व त्याचबरोबर कुटुंब आणि आईबाबांची जिद्द ही मार्गी लागणार.
आम्ही स्टार की कंपनीच्या स्टार की फौंडेशन व युवक प्रतिष्ठानच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत रेहान आणि इरफानला मशीन देण्याचे ठरवले.
श्री. रोहित मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी स्टार की यांना लिहिलेले पत्र
दोघांचे ही ऑडिओग्राम काढण्यात आले/पाहण्यात आले.
इरफानचा ऑडिओग्राम
रेहानचा ऑडिओग्राम
90% पेक्षा अधिक श्रवणशक्ती (Hearing loss) मध्ये दोष आढळला. म्हणजेच यांना टॉप क्लासची मशीन द्यावी लागणार. यासाठी आम्ही विविध देणगीदारांना (Donors) अपील केले. बिईंगह्युमन फौंडेशनेही 40,000 रुपयांची मदत केली. थोडे पैसे पप्पू खानने दिले बाकीचे पैसे आम्ही युवक प्रतिष्ठानने दिले. हिअरिंग लॉस चेक करणे, कानाचे माप घेणे, मशीनची टेस्टिंग करणे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून 18 सप्टेंबरला रेहान व इरफानला स्टार कीचे टॉप मॉडेलच्या मशीनच सुपूर्द केल्या. दहा दिवस कंपनीच्या ENT स्पेशालिस्टच्या मार्गदर्शनाखाली इरफान व रेहाननी मशीन वापरायची सुरुवात केली.
त्यानंतर दि. 28 सप्टेंबर, 2019 या दिवशी श्री. पप्पू खान हे त्यांची पत्नी आणि मुलांसह मशीन लावून मला भेटण्यास आले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच्या कृतज्ञतेचे स्मितहस्य पाहून फार समाधान मिळाले. त्यांना पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या 2 वर्षात आम्ही “मला ही ऐकायचं आहे” हा लहान मुलांसाठी त्यांची श्रवण शक्ती सुधारण्यासाठी कानाचे ऐकण्याचे मशीन देण्याचा प्रकल्प राबवित आहोत.
‘ऐका स्वाभिमानाने’ या प्रकल्पाअंतर्गत जेष्ठ नागरिकांना चांगले कानाचे ऐकण्याचे मशीन देऊन त्यांचा स्वाभिमान, आत्मविश्वास परत देण्याचा प्रकल्प ही सुरु आहेत.
सारांश:
- आनंद आणि समाधान असे की सरकारी जे. जे. हॉस्पिटल मध्ये कोणीतरी पालक आपल्या मुलांना घेऊन जातात आणि त्यावेळी तिथल्या व्यवस्थापनाकडे एक फक्त पत्रक बघून किरीट सोमैयांच्या कार्यालयात धावत येतात हा समाजाचा आमच्यावरील विश्वास.
- आमच्या सारख्यांनी अशाप्रकारचा एखादा प्रकल्प हातात घेतल्याबरोबर स्टार की सारख्या इंटरनॅशनल/मल्टीनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (दिल्ली) श्री. रोहित मिश्रा यांचा आमच्यावर एवढा विश्वास व्यक्त करून संयुक्त प्रकल्पासाठी सहकार्य/समर्थन देण.
- वेगवेगळ्या खाजगी ट्रस्ट तसेच CSR मधून लोकांना श्रवणशक्ती परत देणे व त्याद्वारा हास्य व आत्मविश्वास देणे यासाठी सर्व प्रकारची मदत करणे.
- श्री. पप्पू खान सारखे पालक जिद्दीने आपल्या पाल्याला/मुलांना श्रवणशक्ती मिळवून देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठीची जिद्द प्रयत्नांची पराकाष्ठा.
अशाप्रकारच्या विधायक कामामुळे इतरांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून राजकारणातील कटुतेवर मात करून पुन्हा जिद्दीने समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करण्याच्या आमच्या संकल्पाला गती मिळते. समाजासाठी काही करण्याचा आनंद आमचा विश्वास/जिद्द द्विगुणित करतो.
रेहान आणि इरफान सोबत किरीट सोमैया