Return to site

“एक घर अनेकांना विकले”

किरीट नामा- 17

· marathi

12 महिन्यांच्या संघर्षानंतर महेश पाटीललारुपये 23 लाख 50 हजार परत मिळाले

एकच घर/सदनिका अनेकांना विकणे,फसवणूक करणे असे अनुभव अनेकांना येत असतात. दिलेले पैसे परत मिळवणे हे एक “भगीरथ” कार्य असते. असाच एक अनुभव महेश पाटीलला, आम्हांला आला. महेश आणि त्याची पत्नी सौ. मयुरी पाटील यांची चिवट, जिद्द अन्यायासमोर संघर्ष सतत 18 महिन्यांचा पाठपुराव्यानंतर23 लाख 50 हजार परत मिळाले.

कथा महेश पाटीलच्या संघर्षाची

  • महेश पाटील परिवार मुलुंड पूर्व येथे राहतात.
  • मुलुंड पूर्व येथे त्यांनी स्वत:लाराहण्यासाठी वेगळा फ्लॅट/सदनिका घेण्याचे ठरविले. भाविनी एनक्लेव कॉ. ऑप. हौ. सो., मुलुंड पूर्व या सोसायटीत त्यांनी तिथले निवासी सावंत यांचा फ्लॅट विकत घेण्याचे ठरविले.
  • ठरल्याप्रमाणे महेशनी 23 लाख 50 हजार रुपयेAdvance (टोकन)म्हणून सावंत कुटुंबियांना दिले.
  • त्यासाठी बँकेत गृहकर्जाचा अर्ज करण्यास आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली.
  • सावंत परिवाराकडे पाटीलानी खरेदी खत व इतर आवश्यक कागदपत्रे मागितले. काही कागदपत्र त्यांना दिले गेले.
  • बँकेला भाविनी एनक्लेव कॉ.ऑप.हौ. सोसायटीचे ना हरकत पत्र हवे होते.ते सावंत परिवाराने शेवटपर्यंत दिले नाही.
  • महेश पाटील गृहकर्ज मिळवण्यासाठी प्रयत्नात असतानाचकोणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिलेकी सावंत परिवाराने ही सदनिका अगोदरच 2016 मध्ये श्री. विवेक विद्याधर पाटीलयांना विकली होती.
  • श्री. विवेक पाटील यांस बँक ऑफ इंडिया गिरगाव शाखेनी 90 लाखाचे कर्जही मंजूर केले होते.
  • 90 लाखांचा चेक 17 मे 2016 ला बँक ऑफ इंडिया गिरगाव शाखेने सावंत परिवार यांच्या खात्यात जमा केला होता.

बँक ऑफ इंडियाने सावंत यांना दिलेला चेक

broken image

आश्चर्याची बाब अशी की, सावंत परिवाराने 2016 मध्ये आपली जागा विवेक विद्याधर पाटीलला विकली. विवेक पाटील व सावंत यांनी मिळून बँक ऑफ इंडिया गिरगाव शाखेला कागदपत्र सुपूर्द केली. 90 लाख रुपये ही घेतले, विवेक पाटील या गृहकर्जाचे हप्ते पण काही महिने भरू लागले. परंतु, सावंत यांनी घर रिकामे पण केल नाही. तसेच, विवेक पाटीलनी आग्रहही केला नाही. सावंत आणिविवेक पाटील यांनी बँक ऑफ इंडियाकडून आलेले पैसे वाटून घेतले. हिच सदनिका सावंत परिवारांनी महेश पाटील यांना विकण्याचे, फसविण्याचे ठरविले.

महेश पाटीलकडून 28 ऑगस्ट 2016 ला 23 लाख 50 हजार रुपये आगाऊ रक्कम पण घेतली. बँकेतून गृह कर्ज काढण्यासाठी सहकार्य करण्याचे नाटक ही केले. गोंधळ तेव्हा लक्षात आला ज्यावेळी महेश पाटीलनी सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र मागितले.

याच दरम्यान श्री. महेश पाटील यांना विक्रोळी रजिस्ट्रेशन कार्यालयात हा फ्लॅट विवेक पाटील यांना विकल्याचे खरेदी खत झाले आहेअसे कळले.

  • सावंत परिवाराने विवेक पाटील यांना ही सदनिका 1 कोटी 20 लाखांमध्ये विकली असल्याचे दाखविले.
  • त्यासंबंधीचे कागदपत्र खरेदी खत, रजिस्ट्रेशन सगळेच दस्तऐवजीकरण(Documentation) करण्यात आले होते.
  • महेश पाटीलकडून 23 लाख 50 हजार रुपये घेतल्यानंतर सावंत परिवाराने हीच सदनिका श्री. विनय म्हात्रे यांना विकण्यासाठी बोलणी चालू केली होती.
  • त्या परिवाराकडून 1 लाख रुपये आगाऊ रक्कमपण घेतली.
  • महेश पाटीलनी आपल्या दुसऱ्या बँकेत गृह कर्जासाठी अर्ज केला,त्यांचे कर्ज मंजूर (Approve) झाले. परंतु त्यांना लागणारे कागदपत्र देण्यासंबंधी सावंत परिवार दिरंगाई करत होते.
  • त्यावेळेला महेश पाटीलला शंका आली.त्यांनी व्यवहार तुटल्याचे सांगितले.
  • सावंत यांना दिलेले 23 लाख 50 हजार रुपये परत मागितले.
  • परंतु बरेच दिवस झाले तरी त्या पैसे देत नव्हत्या.
  • आतामात्र श्री महेश पाटील चिंताग्रस्त झाले. त्याच वेळेस ते मला येऊन भेटले आणि सर्व परिस्थिती कथन केली.

महेश पाटील यांचा अर्ज

broken image

मी सर्व माहिती त्यांच्या अर्जासह घेऊन आणि लगेच खालील अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेव पाठपुरावा सुरु केला.

  • डी.सी.पी. पोलीस, झोन VII, मुलुंड
  • श्री. दिनबंधू मोहपात्रा, मॅनेजिंग डिरेक्टर/सी.इ.ओ. बँक ऑफ इंडिया
  • झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया
  • निबंधक सहकारी संस्था

 

  • मी स्वत: बँक ऑफ इंडियाच्या गिरगाव शाखेलासावंत यांनी केलेल्या फसवणुकीची माहिती दिली.
  • परंतु बँक ऑफ इंडियाने असे सांगितले की, महेश पाटीलने सावंत यांना पैसे श्री. विवेक पाटील यांच्याशी फ्लॅट विक्रीबाबत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दिले असल्यामुळे बँक जबाबदार नाही असे सांगितले.

बँक ऑफ इंडियाचे पत्र

आमची काहीही चूक नाही

broken image
  • बँक ऑफ इंडियाने कागदपत्रांची छाननी करताना Agency ची काही ही चूक झाली नाही असे उत्तर आम्हांला 8 मार्च, 2018च्या पत्रात देऊन प्रकरण झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.
  • बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांवर विसंबून काहीही शहानिशा न करता कर्ज दिले होते. विवेक पाटील यांना कर्ज दिल्यांनतर जो पाठपुरावा करायला हवा होता. त्यामध्ये बँकेने दुर्लक्ष केले होते.
  • विवेक पाटील यांनी गृह कर्जाच्या नावाने बँकेतून कर्ज घेतले आहे हे बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहित होते किंबहुना त्यांनी दुर्लक्ष केले.
  • अशा प्रकाराने बँकेतून कर्ज मिळाल्यानंतर काही महिने हप्ते भरायचे व नंतर Defaulter व्हायच अशा प्रकारची कार्यपद्धती असते.         
  • यात स्थानिक अधिकाऱ्यांची मदत असते.
  • याप्रकरणात सुद्धा सावंत परिवार, विवेक पाटील आणि बँक ऑफ इंडियाचे स्थानिक अधिकारी यांच्या संमतीने हा डाव रचला होता. म्हणून बँकेचे अधिकारी, पोलीस मला आणि महेश पाटीलला सहाय्य करत होते.
  • बँकेच्या संमतीने गृह कर्ज घेऊनफ्लॅट घेणे आणि एकाचा फ्लॅट दोन ते चार लोकांना दाखविणे, विकणे, फसवणे त्यांच्याकडून आगाऊ रक्कम (Advance) घ्यायची असे गैरकृत्य सावंत परिवार व विवेक पाटील, स्थानिक अधिकाऱ्यांचे होते.
  • हा डाव आम्ही हाणून पाडला, निष्पाप/प्रमाणिक महेश पाटीलला न्याय मिळून दिला.

डिसेंबर 2016 मध्ये देखील सावंत यांनी श्री. विनय म्हात्रे यांच्याशी पण फ्लॅट विक्री बाबतचा व्यवहार केला होता व त्यांच्याकडून टोकन म्हणून 1 लाख रुपये घेतले होते. ते पण त्यांना अद्याप परत केले नाहीत अशी तक्रार मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे.

यावरून असे सिद्ध झाले की,सावंत यांनी एकूण तिघांना फसवले.

  • सावंत यांनी सोसायटीच्या नावे बनावट NOC बनवून विवेक पाटील यांना दिली.
  • विवेक पाटील यांनी जून 2016 ला सावंत यांना आपला व्यवहार होणार नाही असे कळविले.
  • बॅंकेकडून पैसे मिळाल्यानंतर दोन महिन्यातच सावंत परिवार व विवेक पाटील यांनी फ्लॅट खरेदी व्यवहार रद्द झाला असल्याचा करार (Agreement)केला.
  • सावंत परिवाराने विवेक पाटीलच्या विरुद्ध मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये विवेक पाटीलने  सोसायटीचे बोगस कागदपत्रे तयार केले अशीतक्रार केली. परंतु याची माहिती बँकेला आणि सोसायटीला दिली नाही.
  • त्यामुळे त्या मूळकागदपत्रांसह विवेक पाटील व सावंत परिवार यांनी डाव रचला व सावंत यांचा फ्लॅट विकत घेण्यासाठी बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज 90 लाख रुपये घेतले व ते आयसीआयसीआय बँकेत सावंत यांच्या खात्यात जमा केले. त्यातील 50 लाख रुपये सावंत आणि 40 लाख रुपये विवेक पाटील यांनी वाटून घेतले.
  • अश्या प्रकारचे पत्र सावंत यांनी सीटी सिव्हील कोर्ट नं. 37 येथे सादर केले.
  • सावंत यांनी श्री. विवेक पाटील यांच्याकडून 50 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. 5% व्याजाने व त्याबदल्यात फ्लॅट गहाण ठेवला होता.
  • त्यानंतर लगेच 16 जून 2016 ला फ्लॅट नको असल्याचे व पैसे परत देण्यासाठी सावंत यांना पत्र लिहिले आणि ह्या फ्लॅटवर माझा अधिकार राहिला नाही आपण कोणासही विकू शकता. असे बनावट कागदपत्रे ही तयार केले.
  • महेश पाटील व मी, पोलीस अधिकारी, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director), बँक ऑफ इंडियाचे मुख्य दक्षता अधिकारी (Chief Vigilance Officer) तसेच बँकिंग मिनिस्टर (भारत सरकार) यांच्याकडे पाठपुरावा केला.महेश पाटील यांची फसवणूक/लबाडी सावंत यांच्याकडून झाली आहे. तसेच, सावंत परिवार, विवेक पाटील  आणि बँक ऑफ इंडियाचे स्थानिक अधिकाऱ्यान विरुद्ध कारवाई व्हावी असे आमचे प्रयत्न राहिले.
  • अशाप्रकारे विविध पोलीस अधिकारी, बँक ऑफ इंडिया चे प्रमुख अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेवटी City Civil Court नं 37ने निकाल दिला.
  • 18 फेब्रुवारी 2019 ला 23 लाख 50 हजार रुपये सावंत यांनी महेश पाटील यांना परत केले.

या सगळ्या प्रकरणात बँक ऑफ इंडियाचे Chief Vigilance Officerश्री. देवेंद्र शर्मा यांनी खूप सहकार्य केले.

बँक ऑफ इंडियाचे मुख्य दक्षता अधिकारी यांचे पत्र

घोटाळा झाला असल्याचे मान्य

broken image
  • ज्या बँक ऑफ इंडियाने 8 मार्च, 2018 च्या पत्राद्वारआमची काही ही चूक नाही असे सांगून सावंत परिवार, विवेक पाटील तसेच बँकेचे घोटाळेबाज अधिकाऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होता, त्यात बँक ऑफ इंडियाचे मुख्य दक्षता अधिकारी (Chief Vigilance Officer) यांनी घोटाळा झाला असल्याचे मान्य केले, कारवाई करण्याचे निर्देश दिले व महेश पाटीलला न्याय मिळावा अशी कारवाई करण्याचे बँक ऑफ इंडियाला आदेश दिले.
  • त्यांनी आमची/महेश पाटीलची तक्रार दाखल करून घेतली.
  • बँकेचे महाव्यवस्थापक (General Manager) यांना फसवणुकीच्या चौकशीचे आदेश दिले.
  • बँकेचे Chief Vigilance Officer श्री. देवेंद्र शर्मा यांनी ही फसवणूकअसल्याचे मान्य करून त्वरित चौकशीचे आदेश दिले. तसेच बँकेला गिरगाव पोलीस स्टेशन येथे फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
  • गिरगाव पोलीसांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनीदक्षता अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे संबंधितांवरतक्रार दाखल करून घेतली.
  • गिरगाव पोलीसांनी तपास करून चौकशी सुरु केली. भाविनीएनक्लेव कॉ. ऑप. हौ. सो., मुलुंड पूर्व येथील सावंतांचा फ्लॅट बँक ऑफ इंडिया, पोलीसांच्या मदतीने जप्त करण्याची कारवाई हाती घेतली.
  • अखेर महेश पाटीलला न्याय व फ्लॅटचे पैसे मिळाले व पोलीसांच्या मदतीने गुन्हेगारी/फौजदारी कारवाई पार पाडली.

महेश पाटील आपल्या पत्नीसह भेटून माझे आभार मानू लागला ते म्हणाले,

“साहेब तुम्ही आमच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभे राहिलात म्हणून हे शक्य झाले. नाहीतर कठीण होते.”