Return to site

“दिलकी बात”

(StoryofaHeartTransplant)

किरीट नामा- 15

· marathi

16 ऑगस्ट 2019 रोजी मला एकफोन आलात्याचनावहोतनरेंद्र विश्वकर्मा.तो म्हणाला,

"सर आज मेरे पुर्नजीवन कोदो साल पुरे हुए, अर्शिर्वाद दिजिये."

“सर, आपण व आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मला हे नवजीवन प्राप्त झाले आहे.”आपणा सर्वांच्या मेहनतीमुळे दोन वर्षांपूर्वी मुलुंडच्याफोर्टिस हॉस्पिटलमध्ये माझे हार्ट ट्रांसप्लांटचे ऑपरेशन झाले. माझ्या शरीरात एक नवीन हृदयाची धडधड चालू झाली. दोन वर्षांनंतर आता मी अतिशय व्यवस्थितपणे, माझे जीवनव्यतीतकरतआहे.

झालं असं की,

नरेंद्र विश्वकर्मा हा २४ वर्षाचा तरुणपंतनगरघाटकोपर, मुंबई येथे राहणारा आहे. 27 फेब्रुवारी 2016 रोजी प्रथमचत्यालाजरासं जरीचाललेतरदम लागायला सुरवात झाली. रात्री झोपलेले असतानाश्वास घेणे जडजाऊ लागले. बरेच डॉक्टर,विशेषज्ञ यांच्याकडे गेले पण काही निदान होत नव्हतेव शेवटी 11 ऑक्टोबर 2016 ला डॉ.पोतदारयांनीनरेंद्रला Dilated Cardiomyopathy हाआजारझालाआहे असे निदान केल.त्यासाठी तो वेगवेगळी औषधेघेतहोता. Angiographyकरूनसुद्धा काहीहीब्लॉकेजेस नव्हते. त्यामुळे त्याला नवीनहृदयरोपणकरणेहाचपर्यायआहे. असे फोर्टिसचे डॉक्टर श्री. अन्वय मुळे व त्यांचे सहकारी यांनीसांगितले.

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलने त्यांना 20,00,000/- अंदाजे खर्चाचे कोटेशन

broken image
  • त्यालानवीनहृदयरोपणकरावेलागणारअसेनिदानडॉक्टरांनीकेले.
  • त्याचीआर्थिकपरिस्थितीखूपचहालाखीचीहोती.
  • त्याचेवडीलश्री.रामनरेशविश्वकर्माहेएकसुतारकामकरणारेमजूरहोते.त्यांचे  वार्षिक उत्पन्नकेवळ 84,000/- रुपये
  • त्याच्यावर 5 माणसेअवलंबून
  • अशा परिस्थितीत कोणाचीही मानसिकअवस्थाविचित्रचहोणे
  • पैसेउभेकरण्याचेआव्हानखरंतरअशक्यच
  • बाकीकसलंहीज्ञाननाही,ट्रान्सप्लांटम्हणजेकाय? कोणमिळवूनदेते,कायकरायचयसगळीचअसह्यपरिस्थितीत्यामुळे सगळेकुटूंबचिंताग्रस्त झाले.
  • अशावेळेसफोर्टीसचेवैद्यकीयसमाजसेवकश्री.संतोषसारोटेयांनाश्री. रामनरेश  विश्वकर्मा जाऊनभेटले वत्यांनासर्वपरिस्थितीसांगितली.
  • त्यांनी त्यांना काळजीकरूनकाअसादिलासादिला.
  • काही ट्रस्टचेफॉर्मदिलेवत्यांना सांगितले कीआम्ही सुद्धा काही ट्रस्टकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो.

फोर्टिस हॉस्पिटलकडून आवाहन

broken image
  • परंतुकागदपत्रांमध्येमहत्वाचेम्हणजेउत्पनाचा दाखला, रेशनकार्डइत्यादीमिळणेच  अवघड होते.
  • घाटकोपरचेश्री.पराग शहायांच्याकार्यालयानेडॉ.किरीटसोमैया यांच्याकार्यालयात  जाऊनभेटण्याससांगितले.
  • निलमनगर,मुलुंडपूर्वयेथील माझ्या कार्यलयातमीदरशनिवारीसकाळी 10 वाजल्यापासून लोकांना भेटतअसतो. (Public Day)
  • त्याप्रमाणेतेमाझ्याकडे 27 एप्रिल 2017 रोजीआले. मी माझेसहयोगी (वैद्यकीयप्रतिनिधी)श्री. नटुभाईपारेखयांनाबोलावूनकाहीवेळ चर्चाकेलीवपैशांचीजमवाजमवकरण्याचे ठरवले.
  • मी श्री. रामनरेशविश्वकर्मायांनाधीरदेऊनआपलेकाम करणार अशीखात्रीदिली.
  • आपल्याबरोबरएवढेलोकआहेतवआपलामुलगाबराहोईलअसादिलासा  मिळताच,माझ्याकार्यालयातीलप्रत्येकजणहिरीरानेकामालालागले.एकचध्येय, नरेंद्रलाजीवनदानदेण्यासाठी लागेल ते  प्रयत्न करणे.
  • श्री. नटुभाई पारेख यांनी प्रथम उत्पनाचा दाखला मिळविला.

विश्वकर्मा परिवाराचा उत्पन्नाचा दाखला

broken image
  • मुख्यमंत्री, वैद्यकीय सहाय्यता निधी, टाटा ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट यांना देण्यासाठी सर्व कागदपत्रे, रेशनकार्ड, फोर्टिस हॉस्पिटलचे कोटेशन, डॉ.विजिता शेट्टी यांचे आर्थिकमदतीसाठीचेआवाहनपत्र इ.या संपूर्णसंचावर माझे विनंती पत्र(आर्थिक मदत मिळण्यासाठी) यांचासंच बनवून वेगवेगळ्या ट्रस्ट मध्ये देण्यास सांगितले.
  • मुख्यमंत्रीनिधीतूननिधी मिळण्यासाठी श्री.नटुभाई यांनीसंबंधितअधिकाऱ्यांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देऊन शक्य तेवढ्या त्वरेने3,00,000 रुपयांचा चेक फोर्टिस हॉस्पिटलच्या नावाने मिळवला.
  • वेगवेगळ्या ट्रस्टमधून मदत मिळण्यास सुरवात झाली. म्हणजे टाटा ट्रस्टने 5 लाख 98 हजार, सिद्धिविनायक ट्रस्टने 25 हजार रुपयांची मदत केली.
  • तत्पूर्वी श्री. नटुभाई यांनी फोर्टिस हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टर, कर्मचाऱ्यांना भेटून पुढीलउपचार सुरु करावे. पैशाची व्यवस्था डॉ. किरीट सोमैयांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. अशाप्रकारची खात्री दिली.
  • त्याप्रमाणेहवा असलेलाअवयव मिळण्यासाठीच्यानियमाप्रमाणेरुग्णाच्या कागदपत्रांसह जे. जे. हॉस्पिटल मधील Zonal Transplant Co-ordination Centre (ZTCC) येथे जावून नाव नोंदणी केली.
  • यामध्ये जाणकार डॉक्टरांची समिती असते. ती समिती पेशंटच्या Blood Group पासून इतर आवश्यक वैद्यकीय माहिती गोळा करूनपेशंटची नोंद रजिस्टर मध्ये करून घेतात आणि फोर्टिस हॉस्पिटलमध्ये (ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचे आहे) हृदय हा अवयव पाहिजे याचीहीनोंदणी करतात.त्यानंतरपेशंटला अवयव मिळण्यासाठी नंबर देतात.
  • ZTCC संस्था प्रत्यारोपण नोंदणी बुक तयार करते आणि प्रत्येक अवयवासाठी प्राप्तकर्त्यांची संगणकीकृत प्रतीक्षा यादी बनवून त्यांना त्यांचा नंबर आला की सूचित करते.
  • अवयव दानाच्या नियम व अटी http://www.ztccmumbai.org/ztcc/ या लिंकवर उपलब्ध आहेत.

अवयव दानकोण करू शकते-

  • अनेक वेळेला अपघातात मनुष्य गंभीर जखमी होतो. काही वेळेला अपघात अधिक गंभीर असल्यामुळे डॉक्टर रुग्णाला ब्रेन डेड घोषित करून त्यांच्या परिवाराला असा सल्ला देतात की हे अधिक वाचणार नाहीत. life Saving Suppport वर काही तास ते जगू शकतात.
  • अशावेळेला संबंधित रुग्णाच्यानातेवाईकांना बोलवून घेऊन त्यांना अवयव दानांचे महत्व समजावून त्यांना अवयव दान करण्यास प्रवृत्त करतात. जर तुम्ही अवयव दान केलात तर कोणाला तरी जीवनदान मिळेल असे सांगतात.
  • अशावेळी ज्या परिवारात असा भयंकर अपघात घडतो त्यावेळेस ते आपले मानसिक संतुलन संभाळून आपल्या जवळची व्यक्ती जात आहे, गेल्यात जमा आहे. परंतु, त्या व्यक्तीमुळे आणखी अर्धा डझन लोकांना एक चांगले जीवन मिळू शकेल या विचाराने ते डॉक्टर आणि हॉस्पिटलला अवयव दानासाठी लेखी परवानगी देतात.

जे.जे हॉस्पिटल मधून मिळालेली माहिती

  • परवानगी दिल्यानंतर ते अवयव काढल्यावर 6 ते 8 तासापर्यंतच टिकवता (Preserve) येतात.
  • यासाठीज्या रुग्णालयात हे अवयव टिकवण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी न्यावे लागतात.
  • त्यानंतर ज्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण करायचे आहेत. त्याची माहिती संपूर्ण देशात एकत्र संकलित केलेली असते.
  • त्याचे Clinical Report आणिज्याचा अवयव काढलेला आहे त्या रुग्णाचे Report जुळतात का याची पहाणी केली जाते.
  • त्वरित त्या त्या रुग्णालयाशीसंपर्क साधण्यात येतो.
  • त्या गरजू व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येते.
  • व तो अवयव ग्रीन कॉरिडॉर या संकल्पनेतून आणला जातो. या मध्ये Air Ambulance, Ambulance, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, Airport Authority यांची एक टिम करून गरज असलेला अवयव घेऊन पथक रवाना होते. त्यावेळेस ठरलेला मार्ग, ट्रॅफिक पोलीस मोकळा करून ठेवतात व इतर गाडीवाल्यांना कल्पना देऊन बाजूला वाहने उभी करण्यासाठी सांगितले जाते.
  • तो पर्यंत रुग्णालयात ऑपरेशन थिएटर (OT) मध्येडॉक्टरांचे पथक तयार असते.
  • अशाप्रकारे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये 50 हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत.

नरेंद्र विश्वकर्माच्या बाबतीत तो 27 एप्रिल 2016पासून अवयव मिळण्याच्या रांगेत होता. परंतु प्रत्येकवेळेस काहीना काही तरी अडचण येत होतीआणि एक दिवस 16 ऑगस्ट 2017 रोजी त्याला त्वरित फोर्टिस मध्ये अॅडमिट होण्यासाठी फोन आला. त्याप्रमाणे तो संध्यकाळनंतर पोहचला त्याची तपासणी सुरु झाली. कारण कोल्हापूरच्या एक 22 वर्षीय युवतीचे मुंबई पुणे एक्सप्रेस रोडवर अपघात होऊन तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता व तिच्यावर पुण्याच्यारुबी क्लिनिक मध्ये उपचार चालू होते. पण दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड म्हणून घोषित केले व ती जीवरक्षक साधनांनी काही वेळ जगू शकते असे नातेवाईकांना सांगितले.

त्यावर नातेवाईकांना वैद्यकीय समाजसेवकाने येऊन अवयव दान बद्दल माहिती दिली. परंतु अशावेळी काय निर्णय घ्यायचा, तो पण काही मिनिटांत हे अतिशय वेदनादायकअसते.तरीसुद्धा त्यांनी अवयवदानाचानिर्णय घेतला व त्याप्रमाणे वेगवेगळ्या गरजू समित्यांनी आपली गरज सांगितली त्याप्रमाणे तिची फुफ्फसे (lungs) चेन्नईला पाठविण्यातआली.

          17 ऑगस्टच्या मध्यरात्री 1.47 वाजतात्या युवतीचे हृदयRuby Hall Hospital, Pune येथून डॉक्टरांच्यापथकासहरस्तेमार्गानेरवाना झाले व 143 किमी प्रवासग्रीन कॉरिडॉरच्यासंकल्पनेनुसार, केवळ 1 तास 49मिनिटांत पूर्ण करून म्हणजेच पहाटे 3.36वाजता फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे सुखरुप आणण्यात आले.

टाइम्स ऑफ इंडियाची बातमी

broken image

नरेंद्र विश्वकर्मा यांना 16 ऑगस्ट 2017 रोजी रात्री 10.30 वाजता फोर्टीसमध्ये अॅडमिट केले. साधारण पहाटे3.36 वाजता हृदय आणले गेलेव शस्त्रक्रिया रात्री 1.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत चालू होती. जवळजवळ 6.30 ताससुरु होती. त्यानंतर त्यालाICU व Special Room मध्ये 15 दिवस ठेवण्यातआले.

29 ऑगस्ट 2017 ला त्यांना Dischargeदेण्यात आला.त्यानंतर बऱ्याच सूचना व पथ्थे देऊन कमीत कमी 6 महिने घराच्या बाहेर न पडण्यास संगितलेव जवळपासवावरणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा लांब ठेवण्यात आले, कारण कोणत्याही प्रकारे जंतू संसर्ग व त्यामुळे उद्भवणाऱ्या रोगांचा त्याला त्रास होऊ नये.

          यामध्ये डॉ. अन्वयमुळे व त्यांचे सहकारी डॉ. अशिष, डॉ. उपेन, डॉ. जाधव, डॉ. संदीपआणि संबंधितकर्मचारी वर्ग यांनी हीकामगिरीयशस्वीकेली.

डिस्चार्ज प्रमाणपत्र

broken image

अशाप्रकारे ऑपरेशन झाल्यानंतर9 महिन्यांनीतो घरातून पहिल्यांदा बाहेर पडला सरळमाझ्याकडे प्रेमाने मिठाई घेऊन भेटायला आला, माझ्यापायापडून आशीर्वाद मागितले.त्याच्याबरोबर त्याचे वडील पण होते. त्याचेव उपस्थित असलेल्या सर्वांचेचडोळे आनंदाने पाणावले.

नरेंद्रने दिलेला पेढा तो माझ्याआयुष्यातील सगळ्यात गोड पेढ्यांपैकी एक होता/आहे.

माझ्या कार्यालयात नरेंद्र आणि त्याचे वडील

broken image

आज नरेंद्र अंधेरीत काम करत असून आपल्याऔषधांचा व स्वतःचा खर्च होईल इतका पगार मिळवतआहे व आपल्या शरीरात दुसऱ्याचे हृदय बसवूनजीवनाच्या गाडीची धडधड चालू आहे, आनंदाने जीवन व्यतीत करत आहे.

ज्या ज्या लोकांनी, संस्थांनी, डॉक्टरांनी माझे सहयोगी श्री. नटुभाई पारेख (देवदूत), फोर्टिस हॉस्पिटलचे समाजसेवक श्री. संतोष सारोटे, श्री. अतुल शहा, श्री. अशोक राय, श्री. गोलाटीयाआणि इतरअसंख्य, लोकांच्या सहकार्यामुळेचमी हे अतिशय कठीण काम 27 एप्रिल 2017रोजी ठरविल्याप्रमाणे 17 ऑगस्ट 2017 रोजी पूर्ण  करू शकलो.

कोणाला तरी जीवदान देण्यासाठी या सर्वांना जी संधी मिळालीती सगळयांच्याभाग्यात नसते. केवळ नियतीच हे ठरवत असते.

पण यातून मिळणारा आनंद, समाधानयांची भौतिकजगात कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.

या सर्वप्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नरेंद्रची हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी कष्ट घेतले. त्या सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सारांश:

  • जगण्याची जबरदस्त जिद्द
  • प्रयत्नांची पराकाष्ठा
  • येणाऱ्या संकटाशी सामना करण्याची हिंमत
  • अश्या लोकांसाठी अनेक हात उभे राहतात
  • योग्यवेळी योग्य मार्गदर्शन
  • आर्थिक सहाय्य
  • डॉ. अन्वय मुळे यांची टिम आणि फोर्टिस हॉस्पिटलचे सर्वतोपरी सहकार्य
  • अवयवप्रत्यारोपण करून घेणारे रुग्ण व आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचे दु:ख सहन करून दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी अवयव दान करणारे आणि देवदूतासारखे डॉक्टर्स सगळेच अतर्क्य त्या सर्वांना सलाम!
  • ग्रीन कॉरिडॉरमध्येजवळजवळ 400 ट्रॅफिक पोलीस, जनतेचे सहकार्य यामुळे 143 कि.मी.चे पुणे ते मुंबई अंतर केवळ 1 तास 49 मिनटात संपवले.
  • आमच्या सह सर्वांचे ध्येय एकच होते. नरेंद्र विश्वकर्माला नवजीवन देणे.