शलाका आणि नीरज पवई, मुंबई येथे राहणारे तिशीचे एक तरुण दाम्पत्य. शलाका ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुखाची मुलगी. १ जुलै, २०१९ ला शलाका तिच्या नवऱ्याबरोबर येऊन मला भेटली व विनंती केली की IRDA (इन्शुरन्स नियामक कार्यालय) यांच्या कडून इन्शुरन्स एजंटचे परवानापत्र (license) मिळण्यास सहकार्य करावे.
- शलाका IRDA कडे जवळजवळ दोन वर्षे हे परवानापत्र मिळवण्याचा प्रयत्न करीत होती.
- या तरुण दाम्पत्याला आपला स्वतंत्र इन्शुरन्स व्यवसाय सुरु करायचा होता.
- ऑक्टोबर 2018 ला त्यांनी IRDA कडे लायसन्ससाठी रितसर अर्ज केला होता.
- गेले दोन वर्षे सतत पाठपुरावा करून सुद्धा तिला थोडासाही प्रतिसाद IRDA कडून मिळत नव्हता. म्हणून ती गोंधळून गेली होती
1 जुलै, 2019 रोजी तिने मला व्हॉट्स अॅपवर संदेश पाठविला
Shalaka
- १ जुलैलाच मी माझे मित्र असलेले श्री .प्रबोध ठाकूर (ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.) विमा व्यवसायातील एक जाणकार नामांकित नाव असून माझे या विषयावर बऱ्याचदा चर्चा होत असते. त्याने सुद्धा मला या विषयांत लक्ष्य घालून परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे. या साठी IRDA व अर्थ मंत्रालयाशी विमा विभागातील त्रुटी व बदल याबाबत बोलणे आवश्यक आहे.
- Lifemart Insurance Brokers Pvt. Ltd. यांना कश्याप्रकारे मदत करता येईल याबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेतले.
- शलाका व नीरज या दाम्पंत्यांना अशाप्रकारे अडचणी यावयास नकोत असेच मत श्री. प्रबोध भाईनी व्यक्त केले.
- त्यांनी मला IRDAच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले.
- २ जुलैला मी IRDAच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला व त्यांना एका पत्र पाठवून मदत करण्याची विनंती केली.
- या शिवाय मी पुढील ३-४ दिवसांत IRDA हैदराबाद चे सदस्य श्री. सुजय बॅनर्जीशी व मुख्य व्यवस्थापक श्री. रणदीप सिंग जगपाल यांच्याशी हे लायसन्स देण्याच्या बाबतीत गती देण्यासाठी पाठपुरावा केला.
- या विमा व्यवसायात विशेष प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणारे उत्साही तरुण दाम्पत्यांला सहकार्य करायलाच हवे. कारण त्यांच्यात वेगळ्या प्रकारची धडाडी दिसते.
- श्री सुजय बॅनर्जी यांनी मला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन हा मुद्दा लवकरात लवकर सोडविला जाईल याची खात्री दिली.
लक्ष्यात घेण्यासारखे:
- शलाका आणि नीरज यांनी विमा व्यवसाय कंपनी चालू करायची असे सन २०१७-१८ मध्ये निश्चित केले.
- २०१८ मध्ये कंपनीचे नाव ठरविले व आर्थिक तरतूद केली.
- २०१८ पासून त्यांनी परवानगी घेण्याबाबत कार्यवाही चालू केली.
- २४ ऑक्टोबर २०१८ रोजी IRDA ने त्यांचा अर्ज स्विकारला व त्यांच्या M/s Lifemart Insurance brokers pvt. ltd. यांना वैयक्तिकरित्या येऊन व्यवसायाची रूपरेषा (Presentation) देण्याबाबत कळविले.
- ११ मार्च २०१९ रोजी यांनी IRDAच्या नियंत्रकांसमोर presentation केले.
- ५ एप्रिलला IRDAने काढलेल्या त्रुटिंचे निराकरण सुद्धा Lifemart Insurance कंपनीने केले.
- हाच विषय त्यांनी पुढील ३ महिने चालूच ठेवला आणि अखेर वाट बघून १ जुलै २०१९ रोजी ते या कामासाठी माझ्याकडे आले.
- पुढील ८ दिवस मी सातत्याने IRDAच्या संबंधित कार्यालय/अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि ९ जुलैला मला शलाकाचा फोन आला व ती म्हणाली
"किरीटजी जे काम आम्ही गेले वर्षभर करून घेण्यासाठी प्रयत्न करत होतो तेच काम आपण फक्त एका आठवडयातच केले"
9. शलाकाने IRDA ने लायसन्स मिळण्यासाठी अर्ज मंजुर केला आहे. पंजीकृत प्रमाणपत्र (Certificate of Registration) लवकरच देण्यात येईल
शलाकाचा संदेश
10. ९ जुलै २०१९ रोजी Lifemart कंपनीला IRDA कडून खाली दिलेला संदेश मिळाला
शलाका आणि नीरज यांना अतिशय आनंद झाला आणि आता ते Insurance Agency चा आपला स्वत:चा व्यवसाय करू शकणार आहेत. त्यांच्या पुढील व्यवसायिक वाटचालीस शुभेच्छा!
IRDA ने दिलेले प्रमाणपत्र
“विश्वास आणि कृतज्ञता” याची प्रचिती शलाका आणि नीरज वंजानीसह किरीट सोमैया