Return to site

निष्पाप गृहखरेदी करणाऱ्यांना फसवणारा बिल्डर

किरीट नामा- 9

· marathi

गेल्या काही आठवड्यांपूर्वी वाशीहून श्री. पीटर फर्नांडिस आपल्या कार्यालयातील 4/5 सहकाऱ्यांसह मला भेटण्यासाठी आले होते. त्यांचा विषय साधारण असा होता जवळजवळ 100 ते 150 प्रामाणिक “गृह खरेदी करणाऱ्या निष्पाप लोकांची बांधकाम व्यवसायिक (Builder) कडून फसवणूक”.

थोडक्यात माहिती अशी की,

  • सचिन झेंडे नावाचा तथाकथित बांधकाम व्यवसायिकाने शेकडो ग्राहकांची आर्थिक लुट, त्यात नवी मुंबई परिसरातील मध्यमवर्गीय, नोकरदार आणि इतर गरीब निष्पाप लोक
  • साधारणपणे 2010 साल पासून या सचिन झेंडेने नाशिक, मुंबई, पुणे, नवी मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील लोकांना घरे देतो सांगून फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरुहोता.
  • मुंबईतील शिवाजीपार्क, मालाड.... इ. अनेक पोलीस स्थानकात त्यांच्या विरुद्ध लेखी तक्रारी केल्या परंतु त्यावर योग्य कारवाई झाली नाही.
  • आम्ही हे काम लावून धरायचेच असे ठरवून श्री. पीटर फर्नांडिस यांना अश्या प्रकारच्या फसवणूक झालेल्या आणखी लोकांना सामाजिक माध्यमातून (whatsapp) एकत्र करण्यास सांगितले.
  • नंतर लगेचच आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय कुमार यांना भेटून त्यांच्यासह एका बाजूला आर्थिक गुन्हेगारी विभागाचे पोलीस अधिकारी व समोर फसवणूक झालेले ग्राहक अशी गोलमेज (Round Table) सभा घेतली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली.

घर खरेदीदार प्रतिनिधींची नवी मुंबई पोलिस स्टेशनला भेट

broken image
  • त्यांनी सचिन झेंडेच्या विरुद्ध फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांनी नविन तक्रार अर्ज देण्यास सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
  • अश्या प्रकारचे अनेक FIR नवी मुंबईतील अनेक पोलिस स्टेशन मध्ये अगोदरच केलेले आहेत हे ऐकून पोलिस आयुक्तांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
  • सचिन झेंडेच्या अटकेचे वॉरंट देखील ग्राहक न्यायालयाने दिलेले असताना त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही.
  • पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे विभाग नवी मुंबईचे उपायुक्त श्री. तुषार दोषी यांना वैयक्तिकरित्या लक्ष देण्यास सांगितले.
  • आम्ही फसवणूकग्रस्त लोकांची एक संयुक्त बैठक प्रियांका बॅक्वेट हॉल, ऐरोली येथे रविवार दि. 14 जुलै, 2019 रोजी संघटित करावयाचे ठरविले.
broken image
  • नवी मुंबई आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त श्री. तुषार दोषी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या शंभरपेक्षा ही अधिक लोकांना आश्वासन दिले की, फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराचा योग्य तो शोध करून कडक कारवाई करू.
broken image

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबईचे उपायुक्त श्री. तुषार दोषी,  डॉ. किरीट सोमैया आणि गृह खरेदीदार

  • त्यांनी फसवणूक झालेल्या लोकांना पुन्हा एकदा नवी मुंबईतील पोलिस स्टेशनमध्ये FIR ची नोंद करण्याची विनंती केली.
  • दुसऱ्याच दिवशी जवळजवळ 80 लोकांनी नविन FIR नवी मुंबई पोलिस स्टेशन मध्ये नोंदविले.

श्री. पीटर फर्नांडिस यांचा संदेश

broken image
  • श्री. जयंत राजूरकर, अन्वेषण अधिकारी आणि श्री. मनोज तातुगडे, लेखक पोलिस अधिकारी यांना सचिन झेंडेच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आले.
  • या संबंधी आम्ही अलिबाग पोलीस अधिक्षकांना भेटून त्यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या.
  • श्री. पीटर फर्नांडिस व माझ्या कार्यालयाने अनेक पोलिस स्टेशन व आर्थिक गुन्हेगारी विभाग वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे सतत दोन दिवस पाठपुरावा केला.

अखेर 14 ऑगस्ट 2019 रोजी सचिन झेंडे यास नवी मुंबई पोलिसांनी अटक केली

पोलिसांनी आम्हांला माहिती दिली

  • आम्ही केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने आज संध्याकाळी श्री. सचिन झेंडे यांना अटक केली आहे.

निसर्ग कन्स्ट्रक्शन

अमृत डेव्हलपर्स

अमृत अतिक्रमण

निसर्ग आर्केड

निसर्ग व्हिला…

या कंपन्यांच्या माध्यमातून छोट्या गृह खरेदी करू इच्छिणाऱ्या शेकडो निष्पाप वाशी, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड जिल्हातील लोकांची फसवणूक केलेला बिल्डर.

  • दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सचिन झेंडे याला फसवणूक केलेल्या सर्व माहितीसह कोर्टापुढे उभे केले.

सचिन झेंडे या फसव्या बिल्डरला अटक

अखेर महाराष्ट्र पोलिस आणि नवी मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने डझनभर पोलिस ठाण्यांना पाहिजे असलेल्या बिल्डरला अटक केली आहे. त्यांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले आणि पनवेलमधील कामोठे, खोपोली आणि कोंडाळे-चिंचवली भागात प्लॉट, रो हाऊस आणि भूखंडांचे आश्वासन दिले. नवी मुंबई पोलिसांनी बिल्डरविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि महाराष्ट्र मालकी सदनिका (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण कायद्याचे नियमन) अन्वये गुन्हे दाखल केले.

      त्याच्या विरूद्ध नवी मुंबईतील खांदेश्वर पोलिस ठाण्यात आणि शिवाजी पार्क पोलिस स्टेशन, मुंबई येथे फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. चेक बाऊन्सचे काही प्रकरणांमध्येही त्याचा नावावर दाखल आहेत. ग्राहक कोर्टात 182 खटले प्रलंबित आहेत. 22 प्रकरणांमध्ये वॉरंटही जारी करण्यात आले.

Peter Fernandes and Affected Home Buyers wrote/message to me and others

 

With the constant & timely intervention of Dr Kirit Somaiya the Belapur Police have finally managed to arrest  Mr Sachin Zendhe the owner of Amrith Infracon Pvt Ltd/ Nisarg Arcade / Nisarg Construction who has cheated many innocent homebuyers to the tune of more than 50crores. There have been several FIRS against Mr Sachin Zendhe.

 

Dr Kirit Somaiya who is fighting against such fraud developers, held several meetings with the affected homebuyers & Police officials to ensure the strictest action was taken against Mr Sachin Zendhe.

 

The affected members have been amazed & astonished by efforts put in by Dr Kirit Somaiya & are now seeing a ray of hope in getting their money back or getting justice also they feel our country is safe hands under the BJP regime who are doing all they can to protect the common man

 

Requesting all affected people of the above projects to come forward & reports the fraud so that such a person is not let loose to cheat other innocent home buyers.

  • पीटर फर्नांडिस यांनी मला कळविले….

The consumer forum Alibaug has issued Non Bailable warrant to the Commissioner of Police Navi Mumbai as Sachin Zendhe wasn't produced by Khandeshwar Police station on previous non bailable warrants issued to them.

I submitted the above NBW to Commissioner office (see inward no) & EOW dept they say we need to inform Taloja Jailor so if Sachin Zendhe is granted bail in present chargesheet no 148 he can get further arrested & produced at Consumer court Alibaug & further remanded to judicial custody if he doesn't pay up my dues

Peter Fernandes

यासंबंधी आम्ही सातत्याने पोलिस आणि न्यायालयाबरोबर पाठपुरावा घेत असतानाच आश्चर्य वाटते की शिवाजीपार्क, मालाड, अलिबाग, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, नाशिक येथे फसवणूक ग्रस्तांनी FIR नोंदविलेली असून देखील आम्ही हा विषय लावून धरेपर्यंत काहीही कारवाई झाली नव्हती. 2010 पासून सचिन झेंडे अश्या प्रकारची फसवणूक करित होता.

निरीक्षण:

  • या संबंधात त्वरित व गांभीर्याने दखल घेतल्या बद्दल मी पोलिस आयुक्त श्री. संजय कुमार यांचे वैयक्तिकरित्या आभार मानतो.
  • श्री. पीटर फर्नांडिस जे स्वत:च सचिन झेंडे कडून फसले गेले होते. त्यांनी आपली नोकरी धंदा सांभाळून निरनिराळ्या पोलिस स्टेशन, माझे कार्यालय, न्यायालये यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच हवे.
  • त्याच प्रमाणे शेकडो फसवणूक ग्रस्तांनी आपल्या कामाच्या वेळा सांभाळत पाठपुरावा करून व आपल्या न्याय हक्कासाठी प्रतिकार केला.
  • श्री. तुषार दोषी (DCP) यांनी ज्या तत्परतेने नविन FIR दाखल करून घेतली त्यांना विसरता येणार नाही.
  • त्याचप्रमाणे DCP श्री. प्रविण पाटील व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जयंत राजूरकर आणि श्री. मनोज तातुगडे यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून ही केस योग्यप्रकारे तयार करून सचिन झेंडे याला तुरुंगात पाठविले.
  • अद्याप दि. 14 सप्टेंबर 2019 पर्यंत सचिन झेंडे तळोजा तुरुंगात आहे.

यापासून शिकण्यासारखे:

  • सचिन झेंडे सारखे असंख्य बांधकाम व्यवसायिक घराची नितांत गरज असणाऱ्या दमडी दमडी जमवून पैसे गोळा करणाऱ्या निष्पाप, प्रामाणिक, गरीब, मध्यमवर्गीय लोकांना/गुंतवणूकदारांना फसवून चक्क लुटत आहेत.
  • अश्या फसवणूकग्रस्तांनी एकत्र येऊन योग्य त्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायला हवा.
  • तक्रारी/FIR नोंदवून पोलिस व न्यायालयाशी सतत पाठपुरावा करायला हवा.
  • आपण श्री. पीटर फर्नांडिस व इतर संघटीत फसवणूकग्रस्तांकडून न्यायासाठी कसे झगडावे हे शिकायला हवे.
  • नवी मुंबई पोलिस आयुक्त श्री. संजय कुमार यांनी जो संयम, गांभीर्य, संवेदनशीलता (छोट्या गुंतवणूकदारांना/गृह खरेदी करणाऱ्यांना) दाखवून सहकार्य केले. ते निश्चितच नजरेआड करता येणार नाही.
broken image

पीटर आणि त्यांचे सहकारी आमच्या कार्यालयात