गुरुवार दि. 13 जून, 2019 रोजी ठीक सकाळी 07.30 वाजताच्या सुमारासमला माझ्याच सहकाऱ्याकडून श्री दिगंबर प्रभू यांच्याकडून जे त्यावेळी चालत्या ट्रेनमधून प्रवास करत होते त्यांच्याकडूनएक संदेश मिळाला.
“ श्री.डी. संथानम हे दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना ट्रेन गुलबर्गा स्थानकावरपोहचण्यापूर्वीच चालत्या ट्रेन मध्ये हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा आकस्मित मृत्यू झाला, कृपया त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत पोहचवा.”
मी लगेचच श्री. दिगंबर प्रभूंशी संपर्क केला व संपूर्ण समस्या जाणून घेतली जे स्वत: एक नाटककार आहेत व मुलुंड पूर्व मुंबई येथील निवासी आहेत.
श्री. दिगंबर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार श्री.संथानमआपल्या कुटुंबासमवेत प्रवास करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्युमुखी पडले. चालत्या ट्रेनमुळे त्यांना काही मदत मिळाली नाही. परंतु ट्रेन गुलबर्गा स्टेशनवर पोहचताच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांचे मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यांचे कुटुंब या धक्क्यात स्वत:स सावरू शकत नाही आणि पुढे काय करावे याचीही योग्य माहिती त्यांस नाही.
श्री. दिगंबर यांच्याकडून पूर्ण माहिती कळताच मी त्वरितच महत्त्वाच्या व्यक्ती जसे की, रेल्वे मंत्रालयातील अधिकारी, डी.आर. एम.- सी.एस.एम.टी. (मुंबई) व माझे दिल्ली सहाय्यक श्री. पंकज बिश्त यांच्याशी संपर्क करून पूर्ण कल्पना दिली. याच बरोबर माझ्या इतर सहकारी सहाय्यक जसे मुंबई येथील श्री. जितेश मतालियाव श्री. महेंद्र जैन जे रेल्वे प्रवासी संघांशी संबंधित आहेत याच बरोबर श्री. नरेंद्र पाटील, रेल्वे मंत्रालयातील श्री. पियूष गोयल कार्यालय, श्री. संजय जैन, डी.आर.एम. सी.एस.एम.टी., डॉ. उमेश यादव, खासदार गुलबर्गा यांनाही संपर्क केला.
काही क्षणातच श्री. संजय जैन यांनी माझ्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला व मला सांगितले की, श्री. हितेंद्र मल्होत्रा हे डी.आर.एम., सोलापूर व गुलबर्गा विभागाचे सर्वेसर्वा असून त्यांना मी आत्ताच श्री. संथानमयांच्या कुटुंबाला आवश्यकती लागणारी सर्व मदत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. अशा दुख:द प्रसंगी त्यांची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी पूर्ण पाडल्याची खात्री करून दिली.
दुखा:त असलेल्या श्री. संथानम यांच्या कुटुंबाशीही मी संपर्क साधला.
- पूर्ण घटना ही हृदयाला चटका देणारी होती. रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी श्री. संथानम यांचे शव आपल्या ताब्यात घेतले होते.
- नियमानुसार अधिकाऱ्यांनी श्री. संथानम यांच्या कुटुंबियांना याची जाणीव करून दिली की मृतशरीर जवळच्याच ‘इस्पितळात’ शवविच्छेदनासाठी न्यावे लागेल. परंतु कुटुंबीयांनी मात्र यास स्पष्ट नकार दिला असे मला रेल्वे अधिकाऱ्यांकडून कळाले. यावर मी स्वत:च कुटुंबियांशी संपर्क केला व त्यांना असा सल्ला दिला की त्यांनी तेथील वैद्यकीय व पोलिसांना आवश्यक त्या सर्व कामास मदत करावी खास करून शवविच्छेदनास कोणताही अडथळा आणू नये.
- मी सोलापूरचे डी.आर.एम. श्री. हितेंद्र मल्होत्रा यांनाही सांगितले की, आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करा. जर तेथील तुमचे वरिष्ठ अधिकारी जागेवर नसतील तर किमान त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधावा व रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलिस (GRP) आणि रुग्णालय यांच्याशी समन्वय साधण्यास सहकार्य करावे.
यावर काही कालावधीतच श्री. हितेंद्र मल्होत्रांनी मला सांगितले की, मी म्हटल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून पुढची सर्व प्रक्रिया त्वरित चालू केली जाईल.
ठीक 12.30 वाजता दुपारी मला श्री. संथानमयांच्या कुटुंबियांनी संपर्क करून सांगितले की सर्व मदत मिळू लागली आहे. इस्पितळातील सर्व सूत्रे हलू लागली आहे. तेथील स्थानिक बी.जे. पी चे मंत्री डॉ. उमेश यादव यांचे कार्यकर्तेही सातत्याने मदत करत आहेत. अन्य सर्व औपचारिकता कोणत्याही अडथळा विना पूर्ण होत आहेत. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वत: बी.जे.पी.चे मंत्री (गुलबर्गा) व त्यांचे सचिव श्री. प्रविण कुलकर्णी यांनीही खूप मदत केली.
रेल्वे अधिकाऱ्यांनीही कुटुंबीयांना ‘शव’ मुंबईपर्यंत आणण्यासाठी अत्यावश्यक रुग्णवाहिकेची सोय करून दिली. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मी श्री. दिगंबर व श्री. संथानम यांच्या कुटुंबियांशी संपर्क केल्यावर कळाले की, ते प्रवासात आहेत व पार्थिवमुंबईला पोहचेपर्यंत रात्र होईल.
रेल्वे अधिकाऱ्यांनीही आवश्यक ती कागदपत्रे तुम्हांला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व कुरियरच्या माध्यमातून पोहचवली जातील. यामुळे कुटुंबियांचाआवश्यक असा 2 तासांचा वेळ वाचला व कुटुंबीय आपला प्रवास लवकर सुरु करू शकले.
रात्री 12.30 ला मुंबईच्या चेकनाक्यावर पोहचताच कुटुंबियांनी दाहसंस्कार संबंधीची आवश्यक अशी अनुमती मुलुंड पश्चिम पोलिसांना केली, पण यावेळी आवश्यक त्या सत्यप्रति असणाऱ्या कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्या कुटुंबियांनी सर्व परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर इतर आवश्यक कागदपत्रेही आम्हांलाव्हॉट्सअॅप व कुरियरच्या माध्यमातून येणार आहेत. मी तिथे उपस्थित नसल्याने माझ्या अनुपस्थितीत श्री. दिगंबर यांनीही पोलिसांना सर्व परिस्थिती समजावली. पोलिसांनाही समजुतीने घेऊन आवश्यकती संवेदनशीलता दाखवली व ‘दाहसंस्कारच्या’ सर्व अनुमती केवळ काही क्षणात देऊन टाकल्या.
रेल्वे पोलिस अधिकारी, श्री. दिगंबर प्रभू व श्री. संजय जैन तसेच, श्री. संथानमयांच्याकुटुंबियांच्या मदतीमुळेच केवळ 24 तासात श्री. संथानमयांचे ‘शव’ गुलबर्गा येथून मुंबईत आणता आले व अंतिम संस्काराचा विधी वेळेवर करता आला.
अशी घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये अशी इच्छा व्यक्त करतो व ईश्वर श्री. संथानम यांच्या आत्म्यास शांती देवो.
यासंबंधित घटनेवरून मला केवळ एवढेच प्रतित करायचे आहे की, अशा दुर्देवी घटना मानावीजीवनातघडत राहतात. या मनाला त्रास देणाऱ्या, सहन न होणाऱ्या, मनाला धक्का देणाऱ्या असतीलही परंतु अशा वेळी शांत व विवेकबुद्धीने विचार करूनच अशा समस्या हाताळाव्यात.
आवश्यक मुद्दे:
- अधिकारी ‘शव’ हे केवळ अगदीजवळच्या नातेवाईकांनाच दिले जाईल असे सुचित करतील.
- शवविच्छेदन हे अतिशय महत्त्वाचे व अतिशय योग्य प्रक्रिया मानली जाते ज्यावेळी एखादा अनैसर्गिक मृत्यू घडतो.
- कायद्यात्मक प्रक्रियाहीअतिशय महत्त्वाची आहे.
- कुटुंबियांसाठीही शवविच्छेदनाची प्रक्रिया अतिशय बचावात्मकतेचा आधार बनू शकते ज्यावेळी कुटुंबातील अथवा नात्यातीलच लोक मृत्यूबाबत साशंकता व्यक्त करतात.
- ‘आयुष्य विमा’च्या आवश्यक कागदपत्रांतही शवविच्छेदनाचाअहवाल अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
- एखाद्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनेत (ती घटना चालत्या ट्रेन मध्ये झाली तरी) रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलिस (GRP), स्थानिक पोलिस, रेल्वे परिचारक, रेल्वे स्टेशन मास्टर, रेल्वे सिव्हील हॉस्पिटल यांची संपर्क करणे व आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करणे योग्य ठरते.
- अशा घटनेत बऱ्याच रुग्णवाहिका दिल्या जातात पण शववाहिनीचा वापर करणे योग्य होय.
- अशा घटनेच अंतिम संस्काराच्या वेळी सिव्हिल हॉस्पिटल, प्राथमिक अहवाल (शवविच्छेदनाचा) पोलिस अहवाल तेथील जेथे अपघात किंवा घटना घडली आणि रेल्वेचा अहवाल याच्या सत्यप्रती दाखवाव्या लागतात.
- स्थानिक पोलिस तेव्हाच ‘अंतिम संस्काराची’ मुभा देतात. ज्यावेळी वरील सर्व अहवालाची पडताळणी होते.
- अंतिम संस्कार झाल्यानंतर ‘बाकी’ राहिलेल्या इतर प्रक्रिया व ‘मृत्यू दाखला’ लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावा.
अशा घटना खूप काही शिकवून जातात. आपल्या कुटुंबाबाबत आपण संवेदनशील व काळजी करणारे असाल तर अशा अनेक अडचणीवर आपण मात करू शकतो.