चेंबूर, मुंबई येथील रामचंदर कोचिंग क्लासचे श्री. राकेश रामचंदर नंदा हे आपल्या कुटुंबीयांसह सुट्टीत इस्तंबूल, तुर्की येथे गेले होते. त्यांना 12 सप्टेंबर, 2019 रोजी संध्याकाळी हॉटेलच्या खोलीत हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यांना त्वरित तुर्कीच्या एका रुग्णालयात हलवले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
13 सप्टेंबरला सकाळीच माझे मित्र असलेले श्री. ललित टेकचंदानी यांचा मला फोन आला व त्यांनी श्री. राकेश रामचंदर नंदा यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली आणि या कठीण परिस्थितीत त्यांना शक्य ती मदत करण्यास सांगितले.
मृत श्री. राकेश रामचंदर नंदा यांची कन्या श्रीमती स्वाती अमित वाधवानी आणि तिचे पती अमित वाधवानी त्यांच्याबरोबर कौटुंबिक सहलीसाठी गेले होते. मी ताबडतोबश्रीमती स्वाती अमित वाधवानी यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर मी भारतीय विदेश मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच, तुर्कीच्या इस्तंबूल येथीलभारतीयदूतावासाशीसंपर्क साधला.
- श्री. व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र राज्यमंत्री
- श्री. नंद कुमार, उपसचिव, परराष्ट्र राज्यमंत्री
- श्री. ओम प्रकाश, परराष्ट्र राज्यमंत्री यांचे वैयक्तिक सचिव
- श्री. संजय भट्टाचार्य, तुर्की येथील भारताचे राजदूत
- श्री. जे. पी. सिंह, कॉन्सुल जनरल, इस्तंबूल
- श्री. संजय के. भारद्वाज, कॉन्सुल (कॉन्सुल अॅण्ड कम्युनिटी वेल्फेअर), इस्तंबूल
(श्रीमती स्वातीयांचा संदेश)
भारतीय विदेश मंत्रालयाला लिहिलेले पत्र
एका तासातच श्री. नंद कुमार, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांनी मला सांगितले की इस्तंबूल दूतावास याबाबत सतर्क झाले आहे.
अशा परिस्थितीतीलघटना/अपघात यासाठी विविध औपचारिकता पूर्ण करावयास लागतात. त्याला अनेक कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो.
- Indian Consulate
- Local hospital authorities
- Local Police authorities
- Relatives in their residential city
- Police, Municipal, Airport Authority in their residential city.
- External (Foreign) Ministry India
माझ्यासह, माझे सहकारी तसेच श्री. अमित वाधवानी, राकेश नंदा यांचे जावई यांनी सदर औपचारिकतासुरु केल्या.
श्री. अमित यांच्याशी झालेल्या संपर्काचा स्वयंस्पष्ट संदेश
श्री. अमित हे उत्तम पद्धतीने माझ्या सह सर्व टीमच्या मार्गदर्शनाप्रमाणे परिस्थिती हाताळत, सर्व औपचारिकता पूर्ण करत होते. हे मी आवर्जून सांगू इच्छितो.
तुर्कीच्या भारतीय दूतावासाचे दूत श्री. संजय भट्टाचार्य हे अतिशय चांगले सहकार्य करून एक-एक कामे पूर्ण करत होते. त्या बाबतचा संपर्क संदेश असा होता की,
विशेषतः अश्याप्रसंगी कुटुंबीयांना प्रशासनातर्फे रुग्णालये, शवविच्छेदन, पोलिस, स्थानिक विमानतळ कार्यालय त्या देशातल्या तसेच स्वत:च्या देशातील कार्यालयातील विविध अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करावा लागतो. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक ते दोन दिवसांचा अवधी लागतो. कधीकधी या मध्ये सार्वजनिक सुट्टी आल्यावर फारच कुचंबणा होते. येथे श्री. राकेश रामचंदर नंदा यांच्या बाबतीत ही 14 आणि 15 सप्टेंबर रोजी शनिवार आणि रविवारची सार्वजनिक सुट्टी होती. अश्यावेळेस कुटुंबियांना संबंधित राजदुतावासास मृतदेह ताब्यात घेऊन ते पाठविण्याचे अधिकार पत्र द्यावे लागते. या प्रसंगी मृत श्री. राकेश रामचंदर नंदा यांच्या पत्नीने अश्याप्रकारचे अधिकार पत्र इस्तंबूलच्या भारतीय दूतावासाला दिले. तिची कन्या स्वाती व जावई अमित हे दोघेच तेथे राहिले व बाकी कुटुंबिय 13 सप्टेंबर, 2019 च्या विमानाने मुंबईत परतले.
श्रीमती सुनिता राकेश नंदा यांचे पत्र
भारतीय दुतावासाने दुसऱ्या दिवशीच सर्व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह 16 सप्टेंबरला तुर्कीश एअरलाईन्सने (Turkish Airlines) पाठविला. स्वाती व अमित देखील त्याच विमानात होते.
मृतदेह विमानाने पाठवण्यासाठी एअरलाईन्सला सर्व प्रकारच्या वैद्यकीय, शवविच्छेदन, पोलिस, पासपोर्ट रद्द करणे इत्यादी औपचारिकता पूर्ण करून मृतदेह उचित देशात एअरलाईन्सच्या तर्फे पाठविणे. त्याचप्रमाणे संबंधित देशातील विमानतळावर पण इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते व काही परवानग्या पण घ्याव्या लागतात. या प्रसंगात श्री. राकेश रामचंदर नंदा याचा मृतदेह तुर्कीश एअरलाईन्सने (Turkish Airlines) पाठविला.
मुंबई विमानतळावर तुर्कीश एअर लाईन्सचे काम सेलेबी (M/sCelebi) कंपनी पाहते. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे हीच कंपनी मिळवते.
मुंबई येथील M/s Celebi कंपनीचे श्री. सौरभ दळवी यांनी संवेदनशीलतेने सहकार्य केले. त्यांचा संदेश असा होता की,
ज्या देशातून मृतदेह आणावयाचा असतो त्या देशाला आपल्या देशाने ना हरकत प्रमाणपत्र/परवनगी द्यायची असते. मुंबई विमानतळावरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पासी यांनी ना हरकत प्रमाणपत्र तुर्कीश एअर लाईन्सच्या इस्तंबूल येथील अधिकाऱ्यांना पाठवले.
तुर्कीश एअर लाईन्सच्या कार्गो विभागातील अधिकारी श्री. राजबीर सिंह यांनी पण खूप सहकार्य केले.
चेंबूर महानगरपालिकेचे अधिकारी श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे सहकारी श्री. भोसले यांनी चेंबूर स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्काराच्या सर्व औपचारिकता पूर्ण करून परवानगी दिली.
भारतीय दूतावासाचे अधिकारी कर्मचारी यांनी दाखविलेले सौजन्य, माणूसकी, सकारात्मक प्रतिसाद तत्परता याचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. आम्ही जेव्हा त्यांचे आभार मानले तेव्हा त्यांनी अतिशय विनम्रतेने मत व्यक्त केले. “My team was doing its duty”. (माझ्या सहकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य केले.)
तुर्की मधील भारतीय दूतावासाचे श्री. जे. पी. सिंह (Consular General) उद्गारले-
निरीक्षण आणि प्रतिसाद
मुंबई विमानतळाचे GVK चे जनसंपर्क अधिकारी श्री. रणधीर लांबा यांनी केलेल्या मदती नंतर त्यांचे आभार मानल्यावर त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी असा संदेश पाठवला तो असा-
श्री. अमित वाधवानी, श्री. राकेश रामचंदर नंदा यांचा मृतदेह घेऊन चेंबूर येथील निवासस्थानी पोहचले आणि मला संदेश पाठविला.
“We were inside the plane. I am sold out to you for life. God bless you abundantly.”
(सर आम्ही विमानात होतो त्यामुळे आपणांस संपर्क करू शकलो नाही. परंतु एकच सांगतो, माझे सर्व आयुष्य आपणांस लाभो व परमेश्वर आपणांस उदंड आशीर्वाद देवो.)