Return to site

भविष्य निर्वाह निधी (PF) कार्यालयाचा भोंगळ कारभार

54 वर्षांच्या बिरेंद्र तिवारींना दाखविले 34 वर्षांचे

किरीट नामा- 11

· marathi

श्री. बिरेंद्र तिवारी, शिवाजी नगर, मानखुर्द, मुंबई येथील एका छोट्या चाळीतला रहिवासी. भविष्य निर्वाह निधी आयुक्तालय, स्थानिक कार्यालये, प्रादेशिक अधिकारी, दिल्ली मुख्यालयापर्यंत आपले वय भविष्य निर्वाह निधीच्या कागदपत्रांवर 54 वर्षे ऐवजी 34 वर्षे दाखविले गेले होते ते बदलून घेण्यासाठी सर्व ठिकाणी अक्षरशः दर दर फिरत होते.  

 • श्री. बिरेंद्र तिवारी हे 1992 सालापासून शिवाजी नगर, मानखुर्द येथे वास्तव्यास होते व एका लघुउद्योगात कार्यरत होते.
 • त्यांचा मुलगा श्री. अभिषेक हा भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असून एकदा त्याने मला त्याच्या वडीलांचे चुकून नोंद झालेले वय सुधारण्यास मदत करण्यास सांगितले. त्यांच्या वडीलांचा जन्म दिनांक 8 जुलै, 1965  असून भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील त्यांच्या कागदपत्रात 8 जुलै, 1985 असे चुकून दर्शविली होते.
 • श्री. अभिषेकने माझ्याशी 7 सप्टेंबर, 2019 रोजी संपर्क साधला.

अभिषेक तिवारी यांचा संदेश

broken image
 • मी त्याला त्यासंबंधीचा तपशील पाठविण्यास सांगितला.
 • दिनांक 14 सप्टेंबरला श्री. बिरेंद्र तिवारीने भविष्य निधी कार्यालयाने केलेल्या त्यांच्या जन्माच्या  वर्षाच्या चुकीबद्दल कागदपत्रांसह एक अर्ज मला पाठविला.

श्री. बिरेंद्र तिवारी यांचा तक्रार अर्ज

broken image
 • श्री. बिरेंद्र तिवारी यांनी 24 मे, 2019 रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात, मुंबई येथे पुन्हा एकदा संपर्क साधला.
 • श्री. बिरेंद्र तिवारी व कंपनीचे मालक यांनी  जन्मतारखेबाबतच्या सत्यतेबाबत एक संयुक्त घोषणापत्र उभयतांच्या संमतीने अर्ज सादर केला.
 • या अर्जाबरोबरच श्री. बिरेंद्र तिवारी आणि त्यांच्या व्ही.एच.एम. इंडस्ट्रीच्या मालकाने भविष्य निधी आयुक्त कार्यालयाला श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्मतारीख 08/07/1985 च्या ऐवजी 08/07/1965 करण्याबाबत विनंती केली.

श्री. बिरेंद्र तिवारी व कंपनी यांचे संयुक्त घोषणापत्र

broken image
 • श्री. बिरेंद्र तिवारी यांनी त्यांच्या आधार कार्डाची छायांकित प्रत भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाकडे सादर केली. आधार कार्डमध्ये श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्मतारीख 08/07/1965 अशी नमूद केली आहे.

श्री. बिरेंद्र तिवारींचे आधार कार्ड

broken image
 • मी श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर, 2019 रोजी भविष्य निर्वाह निधी आयुक्त, ठाणे कार्यालयाला पत्र लिहिले.

किरीट सोमैया यांनी पी एफ कमिशनर ठाणे यांना लिहिलेले पत्र

broken image
 • या कुटुंबाला मी चांगले ओळखत होतो आणि श्री बिरेंद्र तिवारी यांचा मुलगा अभिषेक हा भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेचा शिवाजी नगर, मानखुर्द येथील अध्यक्ष आहे हे पण त्या पत्रात आवर्जून नमूद केले.
 • मी भविष्य निर्वाह निधी आयुक्त ठाणे आणि भविष्य निर्वाह निधी आयुक्त, पूर्व उपनगरी, मुंबई तसेच मुख्यालय दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी अतिरिक्त आयुक्त आणि भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याशी देखील संपर्क साधला.
 • दिनांक 16 सप्टेंबर, 2019 रोजी मला भविष्य निर्वाह निधी आयुक्त, ठाणे यांच्या कडून मला एक संदेश आला. श्री. बिरेंद्र तिवारी यांना त्यांच्या जन्मतारखेबाबत विविध कागदपत्रे जमा करण्यास सांगायला सांगितले.

पी एफ आयुक्त ठाणे यांचा संदेश

broken image
 • मी त्वरित दिल्ली मुख्यालयातील वरिष्ठ भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्री. पंकज रमण यांच्याशीही संपर्क साधला.
 • श्री. बिरेंद्र तिवारी गेले कित्येक महिने आपली भविष्य निर्वाह निधीच्या कागदपत्रावरील जन्मतारखेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विनंती करत होतो. परंतु भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे कर्मचारी त्यांची सतत अडवणूक व दिरंगाई, असहकार्य करत होते.
 • कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारच्या  बेमुर्वत अडवणूकीला वरिष्ठ अधिकारी खतपाणी घालत होते.
 • वास्तविक, पी एफ नियमावलीत आणि इतर कायद्यातही अशी तरतूद आहे की वयाच्या संदर्भातील कोणत्याही चुका दुरुस्त करण्यासाठी जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्या तपासणीनंतर संबंधित व्यक्तीला योग्य वयाच्या पुराव्याचे दाखला/प्रमाणपत्र देऊ शकतो. 
 • गेले 2 वर्षांपासून श्री. बिरेंद्र तिवारी हे भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयांच्या अधिकाऱ्यांना विनंती करत होते पण त्यांनी उत्तर दिले की मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये त्यांची कागदपत्रे नष्ट झाली.
 • भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांच्या कागद पत्रांची छाननी कॉम्पुटर मधून ऑनलाईन करत होते त्यावेळेस श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्मतारीख चुकल्याचे लक्ष्यात आले.
 • तोपर्यंत त्यांना 1985 च्या जन्मतारीखेच्या चुकेबद्दल माहिती नव्हते.
 • मी पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्मतारीखेची नोंद दुरुस्त करण्याबाबत कळविले.
 • ठाणे, महाराष्ट्र येथील सिव्हिल सर्जन यांनी जारी केलेल्या वैद्यकीय पडताळणीच्या वयाच्या/दाखल्याची प्रत मी त्यांना व्हॉट्सअॅपवर दिली. 

सिव्हिल सर्जन, ठाणे यांनी श्री. तिवारी यांना दिलेले वयाचे प्रमाणपत्र

broken image
 • अखेरीस दिल्ली भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त श्री. पंकज रमण आणि मुंबई पूर्व विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्रीमती पूजा सिंह यांनी कळविले की, संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्म तारखेची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

श्रीमती पूजा सिंह पी एफ आयुक्त, पूर्व उपनगर यांचा संदेश

broken image

श्री. पंकज रमण अतिरिक्त पी एफ आयुक्त, दिल्ली यांचा संदेश

broken image
 • 17 सप्टेंबर रोजी भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाने श्री. बिरेंद्र तिवारी यांची जन्मतारीख 08/07/1965 अशी दुरुस्त केल्याचे मला कळविले.

पी एफ आयुक्त, ठाणे यांचा संदेश

broken image

श्री. पंकज रमण अतिरिक्त पी एफ आयुक्त, दिल्ली यांचा संदेश

broken image
 • या ठिकाणी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जर श्री. बिरेंद्र तिवारी यांनी आपली जन्मतारीख भविष्य निर्वाह निधीच्या कागदपत्रांवर दुरुस्त करून घेतली नसती तर कदाचित ते निवृत्त झाल्यानंतर त्यांचे स्वत:चे निवृत्ती वेतन काढू शकले नसते.
 • 2009 सालापासून ते सध्याच्या कंपनीत कार्यरत असून दर महिन्याला त्यांच्या पगारातून पी एफ कापून पी एफच्या खात्यात जमा केला जातो. परंतु चुकीच्या जन्मतारखेमुळे त्यांना पैसे काढता आले नसते.
 • भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सकारात्मक व संवेदनशील असलेले श्री. पंकज रमण, श्रीमती पूजा सिंह यांच्या सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळेच श्री. बिरेंद्र तिवारी यांनी सामाजिक सुरक्षासाठी जमा केलेली पी एफची रक्कम सुरक्षित राहिली व आता ते स्वत:च्या आवश्यकतेनुसार केव्हाही काढू शकतील.