Return to site

बैरुट विमानतळावर अडकलेल्या दोन युवकांची कहाणी

किरीट नामा – 5

· marathi

परदेशात नोकरी मर्चंटनेव्ही क्रूज, जहाजांवर नोकरीच्या नावांवर आपल्या देशातील युवकांना ज्या प्रकारे फसवले जात आहे, त्या प्रत्येक घटनेतून आपणांस धडा घेतला पाहिजे. हि गोष्ट फसवणूकीचे असे उदाहरण आहे व त्याबाबतची सर्व माहिती समजून घेण्याची गरज आहे. ६ ऑगस्ट २०१९ रोजी मी रात्री उशीराच दिल्लीहून मुंबईच्या विमानाने (म्हणजे ७ ऑगस्ट च्या पहाटे पूर्वी) मुंबई विमानतळावर पोहचलो, तोच व्हॉट्स अॅप श्री विजय सोमैयाद्वारा पाठविलेला एक संदेश आला होता, तो याप्रकारचा होता.

broken image
  • श्री विजय सोमैयांचा मुलगा कुश सोमैया आणि ब्रिजेश राय यांच्यासह बैरुट विमानतळावर अडचणित सापडला आहे.
  • मी विजय सोमैयांशी बोलताना जे ऐकले त्यामुळे मी खरंच धास्तावलो.
  • कुश आणि त्याचा मित्र श्री ब्रिजेश यांना नवी मुंबईतील एका दलालाने मर्चंट नेव्हीतील नोकरीसाठी बैरुट पाठवले होते व तेथूनच जहाजावर रुजू होणार होते.
  • ४ ऑगस्ट २०१९ ला सकाळीच कुश आणि ब्रिजेश दोघे बैरुटच्या विमानतळावर पोहचले होते.
  • लेबॅनॉन पोलिसांनी त्या दोघांना विमानतळावरचं थांबवून  चौकशी केली व नंतर मार-झोड केली. श्री विजय यांना आपल्या मुलाची खुप काळजी वाटत होती व त्यांचा मुलाशी संपर्क होत नव्हता.    
  • मी त्वरीत, भारतीय राजदूतावास, भारत सरकारच्या विदेश मंत्रालय, मुंबई BKC मधील विदेश संचार निगमच्या विशेष कार्यालयामधील विविध स्तरावरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  याशिवाय श्री. ज्ञानेश्वर मुळे (वि.मं.चे भूतपूर्व सचिव), श्री. जे. के. साहू, मुंबई विभागाचे I. Officer, जे विदेश विभागात कार्यरत आहेत).

तसेच माझे एक मित्र श्री. संजय पराशर ज्यांचा मर्चंट नेव्ही असोशियनचे क्रियाशील सदस्य आहे त्यांच्याशी सुद्धा बोललो.

लेबेनॉनच्या भारतीय राजदूतावासाच्या मार्फत मला मिळालेली माहिती अशाप्रकारे होती.

broken image

भारतीय दूतावासाचे अधिकारी श्री. शशीकुमार यांचा संदेश असा होता.

broken image

विदेश विभागाचे श्री. जे.के. साहूजी (B.K.C. मुंबईचे I. Office यांच्याकडून दाखविलेली तत्परता व प्रसंगावधानता खरोखरच कौतुकास्पद होती, ती अशाप्रकारची...

broken image

परंतु यानंतर मला जी माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक होती.

  • वास्तविक कुश आणि ब्रिजेश यांना नवी मुंबईतील एका Agent ने फसवले होते.
  • नवी मुंबईतील एक Agent श्री. गुरमीत (SMTF) हा अनेक युवकांना, मर्चंटने नेव्हीसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे व इतर लुभावणारे प्रस्ताव देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडत होता, हाच त्याचा धंदा.
  • त्याची संस्थाही भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाची मान्यता प्राप्त आहे, असेही सांगत असे.
  • सहा महिन्याचे प्रशिक्षण संपताच लगेच नोकरीची खात्री देऊ करत होता.
  • कुश आणि ब्रिजेश यांनीही प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले होते आणि म्हणून प्रशिक्षण संपताच, गुरमीतने त्या दोघांना नोकरीसाठी बैरूटला रवाना केले. तेथे त्यांचा एक स्थानिक Agent त्यांना दोघांना भेटून जहाजावर सलग 9 महिने नोकरी मिळेल असे कंत्राट दिले होते व त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडून गैरमार्गानेही लक्षावधी रुपये लाटले.

या घटनेच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी मला विविध खात्यांचे अधिकारी, विशेषज्ञ आणि माहितीगारांशी चर्चा करताना असे कळविले की हा गोरखधंदा बरेच वर्षे चालू आहे. गरजू युवकांकडून लक्षावधी रुपये लुबाडून विदेशातील दलालाच्या व जहाज कंपन्यांच्या मालकांच्या भरोश्यावर सोडले जात असे, कधीकधी तर नोकरी न देताच परदेशात सोडून दिले जाते.

  • कुश सोमैयाचा अनुभव याचप्रकारचा होता. 
  • त्यांना घेण्यासाठी कोणताही स्थानिक Agent आला नव्हता. 
  • गुरमीतने त्यांना तात्पुरता असा 24 तासांचा व्हिजा दिला होता. 
  • कुश व ब्रिजेशने बैरूटवरून गुरमीतशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या संपर्क होत नव्हता.
  • त्यातच बैरूटच्या विमानतळावरील Wifi/Net व्यवस्थित कार्यरत नव्हते.
  • हे दोन युवक केवळ 18 वर्षांपेक्षा थोडी अधिक वयांची होती व दोघेही फार विचित्र अडचणीत अडकले होते.
  • 24 तासांची व्हिसाचीमुदत संपताच IMM अधिकारी/स्थानिक पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.
  • नशिबाने एका सहप्रवाशाने त्यांना Hotspot Connection देऊ केले व त्यावरून त्यांनी मुंबई स्थित आपले वडील श्री. विजय सोमैयांना या भयानक प्रसंगाची कल्पना Whatsapp च्या सहाय्याने दिली.
  • श्री. विजय सोमैयांनी मला सांगितले की गेल्या तीन दिवसांपासून हे दोघे (कुश आणि ब्रिजेश) बैरूट विमानतळावर अडकून पडले आहेत. 

काही वेळातच बैरूटमध्ये संपर्क झाला आहे हे मी विजय सोमैयांना कळविले

broken image
  • या संपूर्ण सरकारी यंत्रणेचा आणि समाजातील काही चांगल्या व कुशल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही बैरूटच्या भारतीय राजदूतावासाशि संपर्क करू शकलो.
  • भारतीय दूतावासांचा काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कुश आणि ब्रिजेशशी संपर्क साधला.
  • विदेश प्रवासातील भारतीय लोकांच्या रक्षणासाठी असलेले (The Protection of Immignts, Mumbai) यासंदर्भात प्रयत्नशील होते.
  • . संजय पराशर हे सुद्धा इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते त्यांनी मला कळविले.
broken image

विदेश मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. मुरलीधरनजी यांचे उपसचिव श्री. नंदकुमारजींनी कुश आणि ब्रिजेशला मुंबईला परत आणण्यासाठी खूप सहाय्य केले.

broken image

आणि बैरूट भारतीय दूतावासने एक अहवालच पाठविला

broken image

चार दिवस कठोर संघर्ष करून मध्यरात्री 7 ऑगस्ट 2019 ला कुश घरी परत आला

broken image

लेबॅनॉनच्या भारतीय दूतावासाने आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले,

broken image

भारतीय युवकांना अशाप्रकारे अपारदर्शक रित्या नोकरीसाठी परदेशामध्ये पाठविण्या संबंधीच्या व्यवस्थेबाबत मी विविध स्तरांवरील संबंधित अधिकाऱ्यांसमोर ही वस्तुस्थिती मांडणार आहे. या युवकांना परदेशातील नोकऱ्या आणि त्यांची सुरक्षितता या व्यवस्थापनात अनेक सुधारणांची नितांत आवश्यकता आहे व त्यासाठी काही नियमावली करावयास हवी.

  1. मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळेच जहाजांवर व मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्यासाठी डझनाने Agency अवैधरित्या लाखो रुपये प्रशिक्षण (Training) च्या नावावर युवकांकडून घेतात.
  2. युवकांच्या पालकांनी सुद्धा प्रशिक्षण संस्था भारत सरकारच्या परिवहन मंत्रालय, (Shipping Minister) कडून मान्यता प्राप्त आहे का हे पहावे.
  3. प्रशिक्षणानंतर विदेशी जहाजावर नोकरीसाठी योग्य ती प्रमाणपत्रे द्यायला हवीत. फक्त कायदेशीर व           अधिकृत Agency नाच भारतातील युवकांना जहाज/क्रुझवर नोकरीसाठी
  4. पाठवण्याचे अधिकार देण्यात यावे.
  5. गरजू युवकांनी सुद्धा जागृत राहून Agent बाबत पूर्ण पडताळणी केलीच पाहिजे.  नो परिवहन मंत्रालय (Minister & Shipping) विदेश मंत्रालय (External Affairs) विदेश आर मरीनटाईम सर्विस शिपिंग (V. R. marine Time Service Shipping) आणि Defence & Power of Association द्वारा प्रमाणित/अधिकृत Agent च्या माध्यमातून अर्ज करायला पाहिजे.
  6. विदेशातील स्थानिक Agent बाबत पूर्ण माहिती घेऊन त्याची शहानिशा करावी, तसेच व्हिसा व इतर आवश्यक कागदपत्रे सरकारी माध्यम/तंत्राच्या मार्फत घ्यावी.
  7. जे युवक नोकरी निमित्त परदेशात जात असतील त्यांनी तेथील स्थानिक Agent चे फोन नंबर्स, भारतीय दूतावासाचे कार्यालय, अधिकारी यांचे फोन नंबर तसेच भारतातील संबंधित अधिकाऱ्यांचे फोन नंबरची पूर्ण माहिती आपल्याबरोबरच ठेवावी.
  8. भारतीय युवकांना मर्चंट नेव्हीच्या माध्यमातून, आपली सेवा परदेशात पोहचविण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.  सरकारने या दिशेने युवकांना सहकार्य करावे.
  9. क्रुझ आणि जहाजांवर भारतीय युवकांची चांगली प्रतिमा आहे आणि या ख्यातीमुळेच भारतीय तरुणांना खूप प्राधान्य/वाव आहे.  त्याचबरोबर कोणाच्याही भूलथापांना फसून बळीपडू नये, आपण अधिकृत माध्यमांची मदत घ्यावी.
  10. आणि, हो, बैरूट विमानतळावर भेटून त्या अनामिक व्यक्तीने आपला Hotspot/Wifi/Whatsapp च्या मदतीमुळेच कुश सोमैया आपल्या पालकांशी संपर्क करू शकला. केवळ त्याच्याच सहकार्यामुळेच कुश आणि ब्रिजेश याचे भविष्य बरबाद होण्यापासून वाचले.  त्याचेही खूप आभार!

आपण सर्व मिळून अशी एक पद्धती/प्रणाली विकसित करू या की ज्यामुळे जहाजांवर/क्रुझवर जाऊन आपले भविष्य उज्ज्वल करू पहात आहेत अशा युवकांना काही त्रास होणार नाही.

 

-- किरीट सोमैया