श्री. शिवजी दुबे यांनी २००८ मध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण केली होती. वर्ष १९९९ मध्ये "मॅग्नम सिल्क" मिल मधून सक्तीची निवृत्ती घेतल्यानंतर पुढे दीर्घकाळासाठी अन्य लहान सहान कामे ते करीत होते. २००८ मध्ये त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली. तेव्हापासून ते व त्यांचे पुत्र श्री. अवधेश दुबे यांनी पेन्शन मिळविण्याचा प्रयत्न केला.
मुंबई येथील एनआयटीआयई जवळील चाळीत राहणारे श्री. शिवजी दुबे व त्यांचे सुपुत्र श्री. अवधेश दुबे यांनी विविध कार्यालये गाठायला सुरुवात केली परंतु सर्व व्यर्थ ठरले.
- श्री. शिवजी दुबे हे १९८२ पासून मॅग्नम सिल्क मिलमध्ये कार्यरत होते.
- वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते आपली भविष्य निर्वाह निधीची रक्कम परत मिळण्यासाठी व पेन्शन सुरू करण्यासाठी मुंबई येथील भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयांच्या कार्यालयात गेले.
- २०१६ पासून ते छोटे मोठे काम करत होते.
- श्री. शिवजी दुबे भविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते. परंतु दुर्दैवाने २०१७ साली त्यांचे निधन झाले.
- त्यांच्या कुटुंबियांना श्री.शिवजी दुबे यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जून २०१८ मध्ये मिळाली, परंतु त्यांना २००८ सालापासून थकीत राहिलेले निवृत्तीवेतन मात्र मिळाले नाही.
- जवळ जवळ १८ महिने सातत्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जाऊन सुद्धा काही काम होत नव्हते शेवटी श्री. अवधेश दुबे येऊन मला भेटले व मला एक अर्ज दिला.
अवधेश ने मला लिहिलेले पत्र
मी ताबडतोब संबंधित भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून पत्र लिहिले.
मी भविष्य निर्वाह निधी आयुक्त, कांदिवली यांना लिहिलेले पत्र
दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी आयुक्त श्री पंकज रमण यांनी माझ्या पत्राला प्रतिसाद दिला.
श्री. पंकज रमण अतिरिक्त पी एफ आयुक्त, दिल्ली यांचा संदेश
श्री. पंकज रमण यांनी माझ्याकडे अवधेश दुबे यांचा फोन नंबर मागितला आणि अवधेश यांना त्यांच्याशी व इतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले.
मुंबई पूर्व उपनगर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील श्रीमती पूजा सिंग यांनी मला सांगितले की दुबे कुटुंबीयांना निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी कांदिवली येथील संबंधित भविष्य निर्वाह निधी कार्यालयात समन्वय साधणार.
श्रीमती पूजा सिंग पी एफ आयुक्त, पूर्व उपनगर यांचा संदेश
श्री. पंकज रमण, भविष्य निर्वाह निधी आयुक्त हे देखील मला श्री. दुबे कुटुंबियांच्या निवृत्तीवेतन मिळण्यासंबंधित कार्यवाहीबाबत कळवत होते.
पी एफ आयुक्त, ठाणे यांचा संदेश
अखेर मुंबईच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी कळविले की कांदिवली व ठाणे येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधून श्री. अवधेश यांचा दावा सुधारण्यात आला आहे.
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने ०१.०७.२००८ पासून दुबे यांचे कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर केले आहे.
२३.०९.२०१९ रोजी भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी श्री. शिवजी दुबे यांच्या पत्नीला पत्र लिहून माहिती दिली की ०१.०७.२०१८ पासूनचे निवृत्तीवेतन चालू केल्या बाबत कळविले.
श्री. शिवजी दुबे यांना पीएफ आयुक्त, ठाणे यांनी पेन्शन मंजूर केल्याचे पत्र
२८ सप्टेंबर,२०१९ रोजी श्री. अवधेशने मला एक हृदयस्पर्शी पत्र पाठविले-
“जो काम हम एक-डेढ साल तक कोशिश करके करा नहीं पाए,
आप ने एक महिने में कर दिया. पेंशन चालू करने के लिए
धन्यवाद, सर जी.”
अवधेश दुबे यांचा संदेश
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाने मला कळविले की रु. १३४१३१.०० थकबाकी असलेले निवृत्तीवेतन श्री. शिवजी दुबे यांच्या विधवा पत्नीच्या खात्यात जमा केली गेली आहे तसेच मासिक निवृत्तिवेतन त्यांच्या खात्यात नियमितपणे जमा केले जाईल.
श्री. पंकज रमण अतिरिक्त पी एफ आयुक्त, दिल्ली यांचा संदेश
दुबे परिवार जैसे लोगों के छोटे से काम भी करने में जो समाधान मिलता है वही मेरे लिए प्रेरणा का स्त्रोत है.