Return to site

“एका जुळ्या मुलांची कहाणी”

किरीट नामा-19

· marathi

आज 10 डिसेंबर 2019 मला सौ. ललिता अनिल लोगवीकडून व्हाट्सऍपवर कुमार आयुष लोगवी याच्या पहिल्या वाढदिवसाचे निमंत्रण आले.

सौ. ललिता लोगवी यांनी मला पाठविलेला SMS

broken image

मनात आगळ्यावेगळ्या भावना व विचार आले. डिसेंबर 2018 ची घटना डोळ्यासमोर आली.

  • 14 डिसेंबर 2018 ला सौ. ललिता लोगवींनी एक मुलगा एक मुलगी अश्या जुळ्यांना जन्म दिला.
  • प्रसुतीनंतर तिघांची तब्येत व्यवस्थित होती.
  • एक वर्षापूर्वी 18 डिसेंबर 2018 ला कामगार विमा विभागाच्या मरोळ, मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये आग लागली.
  • अचानक लागलेल्या आगीमुळेहॉस्पिटल मध्ये प्रचंड धूर निर्माण झाला.
  • आगीमुळे व धुरामुळे अनेक लोक, रुग्ण जखमी झाले.
  • सौ. ललिता लोगवींच्या खोलीत खूपच धूर जमा झाला, श्वास घायला प्रचंड त्रास होऊ लागला, दोन्ही मुलं अस्वस्थ झाली.
  • आग विझवण्यासाठी व रुग्णांना वाचवण्यासाठी धडपड सुरु झाली.
  • सौ. ललिता आणि दोन्ही मुलांना जवळच्या दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले.
  • परंतु नवजात मुलांना धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला,ते गंभीर जखमी झाले.
  • जुळ्या मुलांपैकी एका मुलीचा मृत्यू झाला व दुसरा मुलगा कुमार आयुष त्यातून वाचला.
  • 10 डिसेंबर 2019ला सौ. ललिता अनिल लोगवींकडून वाचलेल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सत्यनारायण पूजेचे निमंत्रण आले.

          मनात आगळ्यावेगळ्या भावना तसेच मुलांना वाचवण्याची धडपडकर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) हॉस्पिटलच्या सुरक्षा मधील सुधार, सरकारी लालफितेशाहीचा लोगवी परिवारावर झालेला परिणाम, लालफितेशाहीच्या अडचणी हे सर्व डोळ्यापुढे येत आहे.

          याच सोबत मृत आणि जखमींसाठी देण्यात येणाऱ्या मदतीसंबंधी सरकारी व्यवस्थेची व्याख्या, सामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणी/धावपळ असा ही अनुभव ह्या वेळी आला.

  • आगीमध्ये 11 मृत्यू आणि 176 जखमी झाले.
  • कामगार विमा योजनेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संजय कुमार सिन्हा यांनी मृताना 10 लाख व गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
  • कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटल व कामगार विभागाने शासनाची मदत देताना ह्या दोन मुलांना कामगार रुग्णालयातून शासकीय मदत म्हणून फक्त 2 लाख रुपये मदत मिळेल असे सांगितले होते.
  • संबंधित अधिकाऱ्यांनी लोगवी कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यास विरोध केला व म्हणाले, सौ. ललिता लोगवी यांच्या मुलीचा जन्म वेळेपूर्वी (Premature Birth)झाल्यामुळे जास्त जगणार नव्हती. म्हणून तिला 2 लाखांची मदत केली.
  • ही घटना माझ्या निदर्शनास आल्यावरमी सौ. ललिता व अनिल लोगवी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली व त्यांना मदत मिळवून देणार असा विश्वास दिला. 

लोगवी कुटुंबीयांना दिलेले सांत्वन पत्र

broken image
  • केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संसदीय समितीचा अध्यक्ष या जबाबदारीने मी संबंधित कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या अधिकाऱ्यांना सांगितले की “जर एखाद्या पीडित व्यक्तीचा उपचारादरम्यान आगीमुळे किंवा अपघातामुळे मृत्यू झाला असेल, तर सदर व्यक्तीच्या वारसाला भरपाईची संपूर्ण रक्कम मिळाली पाहिजे. "
  • याप्रमाणे लोगवी परिवाराला 10 लाखांची मदत मिळायला हवी होती. परंतु त्यांना फक्त 2 लाखांचीच मदत मिळाली.
  • हॉस्पिटलसुरक्षातसेच रुग्णांच्यासुरक्षेच्यादृष्टीने करण्याच्या योजना/उपाय यावर विस्तृत चर्चा झाली. काही बदल ही सुचवण्यात आले.   
  • या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिस्टीमच्या दृष्टिकोना संबंधी काही सूचना/सुधारणा सुचवल्या होत्या. आज एक वर्षानंतर विभागाने या पैकी बराचश्यासूचना व  सुधारणा स्वीकारल्या.
  • 23 नोव्हेंबर 2019 च्या बातम्यांमध्ये एक बातमी वाचून फार आनंद झाला

“Mumbai’s ESIC hospital to pay full compensation to

fire victims kin”

“अग्निकांडात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण नुकसानभरपाईदेणारमुंबईचेईएसआयसी रुग्णालय”

  • त्यानंतर कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) मृत बाळाला परिपूर्ण 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे लोगवी कुटुंबियांना जानेवारी 2019 च्या दरम्यान 10 लाख रुपयांचा धनादेश स्वरुपात मदत मिळाली.

श्री अनिल लोगवी यांना 10 लाख रुपयांची मदत मिळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला व म्हणाले,

“साहेब तुमच्या सहकार्यामुळे आम्हा गरिबांना मदत मिळाली आम्ही आपले आभारी आहोत.”