·
श्री. दक्षेश शहा गुजरात मध्ये अहमदाबाद जवळ स्नेश रिसॉर्ट प्रा.लि. चालवतात.1996 मध्ये त्यांनी वॉटर पार्क सुरु केले. 40 खोल्यांचे रिसॉर्टची हळूहळू प्रगती झाली. 2018-19 मध्ये त्यांनी 60 नवीन खोल्या बनवायलासुरवातकेली.
- स्नेश रिसॉर्ट हा त्या परिसरात प्रसिद्ध (Popular) आहे. 60 नवीन खोल्यांसाठी आवश्यक फर्निचर चीन मधून मागवण्याचाश्री. दक्षेश शहा यांनी निर्णय घेतला. चीनच्या कंपनीला ऑर्डर दिली.
- 5 ऑक्टोबर 2019 ला श्री. दक्षेश शहांचे फर्निचर घेऊन बोट जेएनपीटी, नवी मुंबई बंदरावर लागली.
- कस्टम क्लिअरन्ससाठीस्नेश रिसॉर्टनीश्री. हेमंत भाटिया (तुळसीदास खिमजी प्रा. लि.) या क्लिअरिंग एजंटची नियुक्ती केली होती.
- बंदरावर बोट लागल्यानंतर 14 दिवसांच्या आत आपला माल तेथून घेऊन जाण्याचे नियम आहे.
- अतिरिक्त 7 दिवस विशेष बाब म्हणून डिलिव्हरीसाठी दिले जातात.
- 19 ऑक्टोबर 2019 पर्यंत श्री. हेमंत भाटिया या एजंटनी कस्टमचे क्लिअरन्स घेऊन जेएनपीटी मधून माल रवाना करायला हवा होता.
- बंदरावर बोट आल्यानंतर ग्राहकाचा माल जेएनपीटीच्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो.
- स्नेश रिसॉर्टचे फर्निचर तुळसीदास खिमजी प्रा. लि. या कंपनीने जेएनपीटी येथील गोडाऊनमध्ये ठेवला.
- 21 दिवसांपर्यंत त्या गोडाऊनमधून माल क्लिअर करून घ्यावा लागतो. अन्यथा दरदिवशी प्रत्येक कंटेनरला 200 डॉलरचे भाडे म्हणजे विलंब शुक्ल भरावे लागते.
- म्हणजे दरदिवशी एका कंटेनरला 14,000 रुपये भाडे.स्नेश रिसॉर्टचा 5 कंटेनर माल होता.
- यातील काही दिवसात 2 कंटेनर माल कस्टम मधून श्री. हेमंत भाटिया या क्लिअरिंग एजंटनी क्लिअर केला.
- उरलेले 3 कंटेनरजेएनपीटीच्या गोडाऊनमध्येच राहिले.
- 26 ऑक्टोबर 2019 पासून श्री. दक्षेश यांना जेएनपीटी गोडाऊन भाडे म्हणूनदरदिवशी एका कंटेनरचे 18% जीएसटी धरून 18,000 रुपये भाडे द्यावे लागत होते. 3 कंटेनर माल अजून गोडाऊनमध्ये असल्यामुळे 54,000 रुपये दर दिवसाला श्री. दक्षेश यांना त्या जेएनपीटीला द्यावे लागत होते.
- श्री. दक्षेश यांना क्लिअरिंग एजंट श्री. हेमंत भाटिया हे रोज वेगवेगळेकरणे सांगत होते.
- सर्वर डाऊन आहे, नेटवर्क नाही, सिस्टिममध्येबिघाड आहे असे सांगत होते. यापरिस्थितीत 6 नोव्हेंबरलाश्री. दक्षेशनी गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व गुजरात सरकारचे मंत्री श्री. प्रदीप सिंहजी जडेजा यांना संपर्क केला व त्यांनी मला संपर्क करण्याचे श्री. दक्षेश यांना सुचवले.
गुजरातचे मुख्यमंत्री श्री. विजय रूपाणी यांच्यासोबत श्री. दक्षेश शहा
- 7 नोव्हेंबर 2019 रोजी श्री. दक्षेश यांचा मला फोन आला, सगळी माहिती त्यांनी मला मेसेज केली.श्री. दक्षेश यांनी मला सगळे मुद्दे सांगितले व जेएनपीटीच्या संबंधित कस्टम अधिकाऱ्यांना संपर्क करण्यास सुचवले.
श्री. दक्षेश शहा यांनी पाठविलेला तपशील
- 8 तारखेला मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला.
- कस्टम कमिशनर
- श्रीमती पल्लवी गुप्ता, कस्टम उपायुक्त
- अतिरिक्त कस्टम कमिशनर
- संबंधित कस्टम अधिकाऱ्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
- कस्टम उपायुक्तश्रीमती पल्लवी गुप्तायांनी 8 तारखेला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारासमला फोन केला व श्री. दक्षेश शहा यांना त्यांनी भेटण्यास बोलावले.
- 8 तारखेला श्री. दक्षेशनी त्यांच्या सहयोगीसह श्रीमती पल्लवी मॅडमची भेट घेतली.
- श्रीमती पल्लवी मॅडमनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतले आणिस्नेश रिसॉर्टला कस्टम क्लिअरन्ससाठी सगळ्या प्रकारची मदत करण्याच्यासूचना दिल्या.
- 2 दिवसात एक गोष्ट स्पष्ट झाली की, यात कस्टमचा दोष कमी परंतु कस्टम क्लिअरिंग एजंट श्री. हेमंत भाटियाचाबेजबाबदारपणा कारणीभूत होता.कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचे बिघाड नसल्याचे सांगितले.स्नेश रिसॉर्टचे क्लिअरिंग एजंटनी आवश्यक ती माहिती जेएनपीटी येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली नव्हती हे स्पष्ट झाले.
- या सगळ्या माहितीसह स्नेश रिसॉर्टने आपला अर्ज कस्टम विभागाला दिला या सगळ्या गोष्टीला 14 नोव्हेंबर उजाडले.
- 26 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या 20 दिवसांचा स्नेश रिसॉर्टचेश्री. दक्षेश शहा यांना त्या शिपिंग कंपनीला रोजचे 50,000 रुपये डेमरेज भाडे/दंड भरावे लागत होते.
- 20 दिवस उशीर झाल्यामुळे 10 लाख रुपये अतिरिक्त भाडे श्री. दक्षेश यांना द्यावे लागले.
- 15 नोव्हेंबरला कस्टम विभागाने श्री. दक्षेश यांचा सगळा माल क्लिअर करून दिला. त्याचबरोबर शिपिंग कंपनी व कस्टम क्लिअरिंग एजंटच्या दिरंगाई व बेजबाबदारपणामुळे श्री. दक्षेश यांना 10 लाख रुपये अधिक मोजावे लागले याची स्पष्टता केली.
- कस्टम उपायुक्त श्रीमती पल्लवी गुप्ता यांनी श्री. दक्षेश यांना क्लिअरिंग एजंट व शिपिंग कंपनीच्या विरोधात तक्रार देण्यास सुचवले. कारण त्या दोघांच्या बेजबाबदारपणामुळे इतरांचे नुकसान होऊ नये.
- श्री. दक्षेश यांनी डेस्टिनेशन मॅरेजसाठी आपला पूर्ण 100 खोल्यांचा रिसॉर्ट एका पार्टीला भाड्याने दिला होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे डेस्टिनेशन मॅरेज आहे म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवट पर्यंत रिसॉर्टच्या सगळ्या खोल्यांमध्ये हे फर्निचर लावून ह्या खोल्या वापरण्यासाठी तयार व्हायला हव्यात.
- शिपिंग कंपनी व कस्टम एजंटच्या बेजबाबदारपणामुळे त्यांचे लग्नासाठी रिसॉर्ट बुक केले आहे त्या परिवाराला प्रचंड त्रास होणार, नुकसान होणारत्याचबरोबर स्नेश रिसॉर्टचे नाव खराब होणार व श्री. दक्षेश यांच 7 दिवसांचेरिसॉर्टचे भाडे ही जाणार ही भीती होती.
- श्री. दक्षेश शहा व आमचे मित्र गुजरातचे मंत्री श्री. प्रदीप सिंहजी जडेजायांनी ही परीस्थीतीत मला समजावून सांगितली होती, हीच परिस्थिती मी कस्टम अधिकाऱ्यांना समजावली होती.
- कस्टम उपायुक्त श्रीमती पल्लवी गुप्ता यांनी स्वत: लक्ष देऊन या अडचणीतून मार्ग काढला. श्री. दक्षेशला व्यवस्थित मदत केली. शेवटी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 3 कंटेनर भरून जेएनपीटी मधूनस्नेश रिसॉर्ट, अहमदाबादकडेनिघाले.
- 17 नोव्हेंबर 2019 ला हे 3 कंटेनर अहमदाबाद येथील रिसॉर्टमध्येपोहचले.
श्री. दक्षेश शहा यांचा संदेश
- आता फर्निचर लावून खोल्या तयार करण्याचे काम जोरात सुरु होणार. 30 नोव्हेंबर पर्यंत श्री. दक्षेशयांचेआता 100 खोल्यांचे रिसॉर्ट डिसेंबरच्या डेस्टिनेशन मॅरेजसाठी तयार होणार.
सारांश:
- समाजात विविध प्रकारची लोक असतात. स्वत:ची जबाबदारी झटकणारी, दुसऱ्यांवर ढकलणारी, अधिक कमिशन व भाडे मिळावे यासाठी खोटे बोलणारी.
- परिस्थिती समजून घेऊन सामान्य जनतेच्या व्यवसायाला आपल्या पदाची जबाबदारी समजून घेऊनवेळप्रसंगी त्या ही पलीकडे जाऊन अधिक मदत करणारी, परिस्थितीतून मार्ग काढणारीपण लोक असतात.
- सहसा सरकारी अधिकारी बेजबाबदार असतात, स्वार्थी असतात. “स्वार्थाशिवाय दाद देत नाहीत” असा आपल्या सगळ्यांचा समज आहे. अशा परिस्थितीत कस्टम उपायुक्त श्रीमती पल्लवी गुप्ता सारखे अधिकारी आपल्या पदाला साजेसे काम करत असतात.
- श्रीमती पल्लवी गुप्ता यांनी प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी हे कसे असावे याचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. श्रीमती पल्लवी गुप्तांचे मी समाजाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो.