चेंबूर, मुंबई येथील श्री. रोशनलाल रूपचंद अरोरा ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत पटाया, बँकॉक येथे वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्स बरोबर फिरायला गेले होते.
श्री. रोशनलाल अरोरा यांचे चिरंजीव श्री. किशोर अरोरा टिळक नगर, चेंबूर, मुंबई येथील घरी असताना 16 सप्टेंबर, 2019 रोजी पटाया, बँकॉकवरून फोन आल्यावर ते गोंधळून गेले व चिंताग्रस्त झाले. कारण ती बातमी अशी होती की, त्यांच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तेथेच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
श्री. किशोर अरोरा तातडीने मुंबईहून पटायाला रवाना झाले. दुसर्या दिवशी माझे सहकारी श्री. प्रकाश मेहता यांनी मला दूरध्वनीवरून फोन करून श्री. किशोर अरोरा आणि कुटुंबीयांना मदत करण्यास सांगितले.
मी तात्काळ संपर्क साधण्यास सुरुवात केली–
- थायलंड येथे असलेले श्री. किशोर अरोरा
- श्री. हितेश मेहता, श्री. किशोर अरोरा यांचे शेजारी, नीळकंठ विहार, विराट नगर, कुर्ला टर्मिनल समोर, मुंबई
- वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्सचे अधिकारी
- श्री. कोमल अगरवाल, भारतीय दूतावास, बँकॉक मधील अधिकारी
श्री. रोशनलाल अरोरा हे 15 ज्येष्ठ नागरिकांच्या गटासह वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्सने बँकॉक येथे फिरायला गेले. ते 16 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी पटायाला पोहोचले. संपूर्ण दिवस सर्वांनी मजा केली.
श्री. रोशनलाल अरोरा हे 16 सप्टेंबररोजी थायलंडच्या पटाया पार्क येथे ग्रुप बरोबर आनंद लुटत असताना
16 सप्टेंबरच्या रात्री अचानक श्री. रोशनलाल अरोरा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्सच्या स्थानिक मार्गदर्शकाने त्यांना त्वरित पटाया येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
बँकॉक मधील भारतीय दूतावास चे श्री. कोमल अगरवाल यांनी मला सविस्तर प्रतिसाद/माहिती पाठवली. त्यांनी नमूद केले-
- हॉस्पिटलला भेट दिली.
- रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर आहे, मूत्रपिंड काम करत नाही, मेंदू खूप कमी काम करतो, 80% हृदय वाहिन्यांच्यात ब्लॉकेज आहेत, ते सध्या कोमात आहेत.
- विम्याचा प्रश्न सोडविला जाईल. हॉस्पिटलचे अधिकारी भारतीय विमा कंपनीच्या संपर्कात आहेत.
- मूत्रपिंडाच्या डायलिसिससाठी प्रचंड खर्च अपेक्षित आहे.
श्री. कोमल अगरवाल, भारतीय दूतावास, बँकॉक यांचा संदेश
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्सचे श्री. सुधीर पाटील यांनी रोशनलाल अरोरा प्रकरणात समन्वय साधण्यास आम्हांला मदत केली. त्यांनी मला माहिती दिली की, श्रीमती इशिता शहा/नाईक ह्या विमा प्रकरणाची दखल घेत आहेत आणि त्यांना या प्रकरणात समन्वय करण्यासाठी नियुक्त केले आहे.
वीणा वर्ल्डचे श्री. सुधीर पाटील यांचा संदेश
मी आणि माझे कार्यालय हे सातत्याने श्री. किशोर अरोरा, श्री. कोमल अगरवाल, बँकॉक येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, श्री. हितेश मेहता, श्री. रोशनलाल अरोरांचे शेजारी यांच्या संपर्कात होते. श्री. किशोर अरोरा यांनी 20 सप्टेंबर रोजी मला सविस्तर पत्र/माहिती पाठविली. त्यांनी नमूद केले –
- 16 सप्टेंबर, 2019 रोजी तो बँकॉकला पोहोचला.
- त्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे; तो तिथेच अडकला.
- वडिलांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च त्याच्या आवाक्या बाहेर होता.
- बँकॉकची स्थानिक भाषा, कायदे, नियम आणि तांत्रिक अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांनी मला विनंती केली.
श्री. किशोर अरोरा यांचा संदेश
भारतीय दूतावास, बँकॉक यांनी मला बँकॉक हॉस्पिटलचा वैद्यकीय अहवालही पाठविला.
श्री. रोशनलाल अरोरा यांचा वैद्यकीय अहवाल
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्सने दर्शविलेली चिंता आणि सहकार्याची मी नक्कीच प्रशंसा करीन. श्रीमती इशिता ह्या माझ्यासह श्री. किशोर अरोरा आणि बँकॉक येथील भारतीय दूतावासातील अधिकारी सतत संपर्कात राहिल्या.
मुंबई येथील वीणा वर्ल्डचे अधिकारी श्रीमती इशिता शहा/नाईक
- श्री. किशोर अरोरा यांना अनेक समस्या/आव्हानांचा सामना करावा लागला.
- त्यांच्या वडिलांचा पासपोर्ट हॉस्पिटलने (पटाया हॉस्पिटल) बिल न भरल्यामुळे जप्त केला होता.
- त्यांना वैद्यकीय/प्रवासी विम्याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती.
- दोन्ही हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय खर्चाचे बिल भरण्याबाबत विचारणा करत होते.
- त्यांनी आपल्या मुंबई बँक खात्यातून लाखो रूपये पटाया हॉस्पिटलच्या खात्यात जमा केले.
- हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की वैद्यकीय उपचाराचा खर्च 30 लाखापर्यंत जाईल.
- ते एकटेच होते.
बँकॉक येथील भारतीय दूतावासाचे श्री. कोमल अगरवाल आणि श्री. मिश्रा तसेच वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि रिलायन्स इन्शुरन्स, स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या मदतीने आम्ही समस्या सोडवू शकलो.
ग्राऊंड हँडलर आणि विमा कंपन्यांनी श्री. रोशनलाल अरोरा यांच्या वैद्यकिय खर्चासाठी पेमेंट/ कॅशलेस सुविधांची व्यवस्था करण्यास सहमती दिली.
अखेर 21 सप्टेंबर रोजी श्री. किशोर अरोरा यांना पटाया मेमोरियल हॉस्पिटलमधून पासपोर्ट परत मिळाला.
श्री. रोशनलाल अरोरांच्या निधनानंतर बँकॉक येथील भारतीय दूतावासाने रद्द केलेल्या पासपोर्टची प्रत
दरम्यान, श्री रोशनलाल अरोरा यांची प्रकृती खालावत होती व डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की ते शेवटच्या टप्प्यावर आहेत.
23 सप्टेंबर, 2019 रोजी मध्यरात्री 01.36 (मध्यरात्रीचे 02.13 - थायलंड वेळ) श्री. किशोर अरोरा यांनी मला सांगितले की त्यांचे वडील श्री. रोशनलाल अरोरा यांचे मध्यरात्री 02.13 निधन झाले.
श्री. किशोर अरोरांचा संदेश
या दरम्यान भारतीय दुतवासाचे श्री. कोमल अगरवाल आमच्याशी सतत संपर्कात होते. त्यांनी आम्हांला/श्री. रोशनलाल अरोरा यांच्या कुटुंबियांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली.
- हॉस्पिटलची जरुरी कामे
- शवविच्छेदनांचा/पोलीसांचा अहवाल
- मृत्यु प्रमाणपत्र
- पासपोर्ट रद्द करणे
- श्री. रोशनलाल अरोरा यांचे मृतदेह मुंबईला परत पाठविण्यासाठी एजन्सीची व्यवस्था
- मुंबईत परत येण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसाठी कार्गो आणि हवाई तिकिटांचे बुकिंग
भारतीय दूतावासाचे प्रमाणपत्र
केअर टेकर (लॉजिस्टिक एजन्सी) कडून मिळालेले प्रमाणपत्र
श्री. कोमल अगरवाल, भारतीय दूतावास, बँकॉक यांचा संदेश
मुंबईत मृतशरीर आणण्यासाठी आणि घाटकोपर येथील हिंदु स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यासाठी थायलंड आणि मुंबई येथील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमोर मी हा मुद्दा उपस्थित केला.
विविध अधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र
अशा परिस्थितीत विविध प्रमाणपत्रे आवश्यक असतात याची नोंद घेतली गेली पाहिजे. या संदर्भात श्री. मायकल यांनी खालीलप्रमाणे संदेश पाठविला.
मुंबई, भारतात मृतदेह आणण्यासाठी लागणारी कागदपत्रे
एअर इंडियाचे श्री. मुकेश भाटिया यांनी श्री. रोशनलाल अरोरा यांचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.
श्री. किशोर अरोरा यांचा संदेश
GVK मुंबई विमानतळावरचे अधिकारी श्री. रणधीर लांबा जे आम्हांला नेहमीच अश्याप्रसंगी मदत करतात, त्यांनी मुंबई विमानतळावरील मृतदेह ताब्यात देण्याबाबतच्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यास मदत केली व मृतदेह संबंधित कुटुंबाकडे सुपूर्द केला.
मुंबई विमानतळ/GVKचे अधिकारी यांनी केलेले सहकार्य
23 सप्टेंबर रोजी पहाटे 2.00 वाजण्याच्या सुमारास श्री. किशोर अरोरा यांनी मला त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली आणि 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा त्यांनी मला कळवले की ते मुंबईला पोहचले.
24 सप्टेंबरच्या मध्यरात्री श्री. रोशनलाल अरोरा यांचा मृतदेह एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आला.
25 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.