40 दिवसांच्या सततच्या प्रयत्नानंतर पुत्र पुनित मेहरा यांची आपल्या आई रिटा मेहरा यांचे अंतिम संस्कार आपल्या मातृभूमीत करण्याची इच्छा पूर्ण झाली.
रिटा मेहरा आपला पुत्र पुनीत यांच्यासह मेलबर्नहून विमानाने मुंबईला निघाले. त्यांना विमानात ह्दयविकाराचा झटका आला. झेंगझोउ चीन मध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल करताच मृत घोषित.
कोरोनामुळे निर्माण होणा-या प्रश्नांचा, अडचणींच्या वेगवेगळ्या कथा आहेत. कोरोना बाधित संपर्कात आलेले लोकच त्या संबंधिच्या अडचणी समजू शकतात. परंतु रिटा मेहरांना विमानात आलेल्या ह्दयविकाराचा झटका व इर्मजन्सी लॅण्डिंगनंतर मृत होण्याची घोषणा चीन मधील झेंगझोउ या शहरातील रुग्णालयात झाली, म्हणून ज्या अडचणी उद्भवल्या, अंतिम संस्कारासाठी 40 दिवस लागले. त्यांच्या या व्यथा, त्याच्या या कथा...
- डॉ. पुनित मेहरा यांच्या आई कै. रिटा मेहरा यांचे पार्थिव एका रुग्णालयात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.
- त्यानंतर पुनित मेहरा यांना जबाब देण्यासाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
- पार्थिव भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावासाची परवानगी आवश्यक असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच शवविच्छेदन प्रक्रियेसाठी किमान महिनाभराची प्रतिक्षा करावी लागेल, असे डॉ. पुनीत मेहरांना सांगण्यात आले.
- पुनितनी 12 दिवस सतत चीन मध्ये राहून आईचे पार्थिव मुंबईत घेऊन जाण्यासाठी पाठपुरावा केला.
- शवविच्छेदन (Post Mortem) करून मृत्युचा दाखला देण्यासाठी कोणी तयार नव्हते, भारतीय दुतावासाने असहाय्यता व्यक्त केली या परिस्थितीत पुनितने आईचे शव (Dead Body), हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवून तो मुंबईत (भारतात) आला.
- मुंबईत आल्यानंतर पुनित मेहरानी आपली मावशी बबली अरोरा यांची मदत घेतली.
- पुनित आणि रिटा मेहरा यांच्या बहिण बबली अरोरा यांनी माझे व्यावसायिक सहयोगी डी. पी. सिंग द्वारा मला15 फेब्रुवारीला संपर्क केला.
- या विषयाचा पाठपुरावा म्हणून आम्ही ताबडतोब
- श्री. मुरलीधरन, विदेश राज्यमंत्री
- सहसचिव, विदेश मंत्रालय, चीन
- बिजींग चीन येथील भारतीय दूतावासाशी सतत समन्वय.
- माझे दिल्ली कार्यालयातील कार्यालय सचिव श्री. पंकज बिश्ट यांच्याद्वारा दैनंदिन पाठपुरावा.
कै. रिटा मेहरा यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी भारतीय दुतावास, चीन यांना केलेला मेल
कै. रिटा यांची बहिण बबली अरोरा यांची पहिल्या प्रतिसादानंतरची प्रतिक्रिया
कै. रिटा मेहरा
- 2 दिवसात भारतीय दुतावासाचे अधिकारी श्री. अरविंद कुमार यांनी आम्हांला व श्री. पुनित मेहरांना माहिती दिली व सूचना दिल्या.
- मध्ये एक वेळ अशी आली होती की, चीन येथील झेंगझोउ आणि बिजिंग येथील स्वास्थ विभाग, पोलिस विभाग, विदेश मंत्रालय... यातील अधिकाऱ्यांनी हात वर केले होते. किती आठवडे लागणार हे सांगता येणार नाही, असं उत्तर देत होते. बिजींग मधील भारतीय दुतावासातील अधिकारीही असहाय्यता व्यक्त करत होते.
चीनच्या भारतीय दुतावासाचे अधिकारी श्री. अरविंद कुमार यांनी पुनित मेहरा व आमच्या कार्यालयाला पाठवलेले पत्र
- भारत सरकारचे विदेश मंत्रालय, चीन येथील भारतीय दूतावास आणि माझा दिल्लीतील सचिव पंकज बिश्ट यांच्या सततचा पाठपुरावा व चीनमधील सरकारी अधिकाऱ्यांचा सहयोगामुळे शेवटी प्रयत्नांना यश मिळाले.
- भारतीय दुतावासाने 3 मार्च, 2020 रोजी आम्हांला कळवले की, कै रिटा मेहरांच्या पार्थिवाला मुंबईत आणण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या परवानग्यांची व्यवस्था झाली आहे आता मुंबईत पाठवित आहोत.
- भारतीय दुतावासाने कै. रिटा मेहरा यांचा मृतदेह 4 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता Etihad flight EY-208 नी मुंबईत पोहोचणार असे आम्हांला कळवले.
- 4 मार्च रोजी दुपारी विमानाने मुंबई विमानतळावर शवपेटी (Coffin) मध्ये बंद कै. रिटा मेहरांचे मृतदेह/पार्थिव आले तेथून वांद्रा पश्चिम येथे संध्याकाळी 7.30 वाजता पार्थिव नेण्यात आले.
- अंतिम संस्कारासाठी नातेवाईक/परिवारातील 30 ते 40 लोक सांताक्रूझ पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमीत कै. रिटा मेहरांचे पार्थिव घेऊन पोहचले.
- कै. रिटा मेहरांच्या पार्थिवावर सातांक्रूझ, मुंबई येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
सांताक्रूझच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
- पुत्र पुनित मेहरा सतत आमच्या संपर्कात होता.
ईश्वरपण काही वेळेला आपली परिक्षा घेत असतो.
- मुलगा पुनित 5 वर्ष ऑस्ट्रेलियाला कामाला होता. त्याला ऑस्ट्रेलियाहून मुंबईला परत आणण्यासाठी आई रिटा मेहरा मेलबर्नला गेल्या. तेथून मुलाला घेऊन मेलबर्न बीजिंग मुंबई विमान मार्गे सुपुत्र पुनित सोबत घरी यायला निघाल्या. वाटेत हृदय विकाराचा झटका आला आई रिटाचे मृत्यू झाला.परंतु अंतिम संस्कारासाठी मृतदेह आपल्या स्वगृही मुंबईला आणनने अशक्य झाले होते.
- कोरोनाग्रस्त चीन मधून अशा विचित्र परिस्थितीत आईचे पार्थिव मुंबईत आणता येणार नाही अशा निराशेने पुनित मुंबईत आला.
- परंतु जिद्द सोडली नाही, विभिन्न लोकांची मदत मागितली. अशा परिस्थितीत ईश्वराने हे काम/सेवा करण्याची संधी आम्हांला दिली.
- या ईश्वरी कामात आम्हांला भारत सरकारचे विदेश मंत्रालय, बीजींग चीन येथील भारतीय दुतावासाचे अधिकारी विशेष करुन श्री. अरविंद कुमार यांनी जी मानवतेच दृष्टीने मदत केली.
- ईश्वर कृपेनी आपण रिटा मेहरांचे पार्थिव मुंबईत आणू शकलो, हिंदू शास्त्रोक्त पद्धतीने अंतिम संस्कार करू शकलो, परिवाराला एक समाधान देऊ शकलो याचेच आम्हांला समाधान आहे.
कै. रिटा मेहरा यांचा मुलगा पुनित आणि पती राजिंदर