Return to site

पूजाची मार्कशीट

किरीट नामा- 8

· marathi

कु. पूजा महेश कुलकर्णी ठाणे/मुंबईतील एक तडफदार हुशार तरुण विद्यार्थिनी तिला Genetics या विषयावर शिक्षण व संशोधन करायची मह्त्वाकांक्षा असलेली परंतु काही अडचणींमुळे तिला प्रवेश घेता येत नव्हता.

Genetics या विषयातून master पदवी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा या इंग्लंड व अमेरिकेत फार चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात. त्याप्रमाणे तिला UK मधील Newcastle University मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता होती. कारण तसे पत्रच तिला आले होते. तरी ती Bsc चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झाली होती. परंतु अद्याप मुंबई विद्यापीठातून तिची गुणपत्रिका व उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आले नव्हते.

जो पर्यंत ती तिची गुणपत्रिका व प्रमाणपत्र इंग्लंडच्या विद्यापीठात जमा करत नव्हती तो पर्यंत तिचा प्रवेश निश्चित होत नव्हते आणि त्याची शेवटची तारीख सुद्धा जवळ येत होती. त्यामुळे पूजा आणि तिचे वडील महेश कुलकर्णी मुंबई विद्यापीठामधे दारोदार फिरत होते. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याचे काम आणखीनच अवघड नव्हेच तर अशक्यच झाले होते. बिचारी पूजा आपली Newcastle University, UK येथील Master in Genetics या विषयाच्या शिक्षणाची आयुष्यातील फार मोठी संधी जाणार या भीतीने त्रस्त झाली.

या दरम्यान श्री. महेश कुलकर्णी यांनी याप्रकारची माहिती मला ट्विट केली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मी त्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती पाठवून देण्यास सांगितले व मला भेटण्यास सांगितले.

महेश कुलकर्णी यांनी त्वरित संपर्क केला.

”Respected sir,

Many Thanks for your response on Twitter today.

My immense love to you as always.

त्यांनी त्याबरोबरच खाली दिलेली माहिती पाठविली.

“ Sir

My daughter has got "conditional offer" from "Newcastle university UK " for doing masters.

She has just completed her Bsc from vazekelkar college with 9.5 CGPA rating. But university of UK will not confirm unless we get individual marksheet from Mumbai university. If this is delayed then her career will be damaged. She wants pursue her career in Genetics and do research to benefit India, she is keen for.

KINDLY follow up with Mumbai University for sooner individual marksheet as even provisional marksheet from college will not be enough, they say.”

मी ताबडतोब मुंबई विद्यापीठाच्या विविध अधिकाऱ्यांना e-mail, whatsapp संदेश पाठविले. यामध्ये-

 1. उप कुलगुरू (Vice-Chancellor)
 2. कुलसचिव (Registrar)
 3. उप कुलसचिव (Deputy Registrar)
 4. परिक्षा नियंत्रक (Controller of Examination)

मी पूजा व महेश कुलकर्णी यांना परत एकदा मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव यांना विनंती अर्ज पाठवून त्याची एक प्रत मला देण्यास सांगितले.

broken image

कुलसचिव आणि उप-कुलसचिव हे अतिशय नम्र व सहकार्य करणारे होते त्यांनी मला सांगितले कि, पूजाला वैयक्तिकपणे विद्यापीठाच्या “कलिना” येथील उप-कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रकांना भेटण्यास पाठविणे.

गेले दोन दिवस पूजा आणि तिचे वडील वरील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. व त्यांना वैयक्तिकरित्या भेटले सुद्धा.

      इकडे Newcastle University मध्ये मार्कशीट जमा करण्याची शेवटची तारीख जवळ येत होती.

माझ्या सह माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा तसेच पूजा आणि तिच्या वडिलांचा उप-कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्या करत असलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

त्याच दिवशी संध्याकाळी विद्यापीठातून परत येता-येता महेश कुलकर्णी यांनी संदेश देऊन माहिती दिली. ती अशा प्रकारची होती-

“My work done, Thanks you very much”

“This regarding my work at kalina

Mumbai university.

We met Dr. vinod patil ( controller of exam) & others. They helped us.

It was your great help and support that we got marksheet of my daughter Pooja Mahesh kulkarni of her Bsc final. She could get Newcastle university UK confirmation in time.

Your help is unforgettable for us.

We wish meet you today for a few minutes to express our gratitude.

-- Mahesh kulkarni

poojainfotech.org”

broken image
broken image

दोनच दिवसात पूजा व महेश कुलकर्णी हे मला भेटायला आले व म्हणाले माझी अशी इच्छा आहे की, आपल्या या प्रयत्नांचा लाभ त्या विद्यार्थ्यांना होईला पाहिजे जे अशा प्रकारच्या समस्यांपासून परेशान आहेत”.

“मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे”.

Thanks a lot sir.

I personally love you for decades. ----------------------.”

- Mahesh kulkarni

broken image

पूजा आणि महेश कुलकर्णी माझ्या कार्यालयात

मला असे वाटते कि, बऱ्याचवेळा दुरवस्था व नेत्यांची उदासीनतेमुळे परीक्षा नियंत्रकांकडून विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

काही वेळा तर कित्येक विद्यार्थांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधीचा त्याग करावा लागतो. याचे कारण म्हणजे मार्कशीट, निकाल वेळेत न लागणे.

एकेकाळी मुंबई विद्यापीठ दर्जा संपूर्ण भारतात नावाजलेला होता. परंतु सध्या मात्र सुधारणा करणे आवश्यक आहे.

काही संवेदनशील आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या मदतीने पूजाला Newcastle University, UK मध्ये Master in Genetic या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.

विशेषतः पूजाच्या बाबतीत श्री. अजय देशमुख (Registrar), डॉ. विनोद पाटील (Controller of Examination) व श्री. वसावे (Deputy Registrar) या सर्व अधिकाऱ्यांची भूमिका कौतुकास्पद आहे.

पूजाच्या या मह्त्वाकांक्षी शैक्षणिक Genetics या विषयातील प्रगतीसाठी आणि त्या शिक्षणापासून मिळणाऱ्या ज्ञानामुळे सर्व देशाला तसेच मानवजातीला लाभ मिळो हिच सदिच्छा!

महेश कुलकर्णीनी मला पाठविलेल्या कृतज्ञता पत्रातील त्यांचा कृतज्ञशील असे भावनोद्गार खाली देत आहे.

पूजाचे वडील श्री महेश कुलकर्णी म्हणतात.

 • मी खात्रीने सांगतो की, डॉ. किरीट सोमैयांसारखा लोकांच्या अडचणीच्यावेळी सहज उपलब्ध असलेला व निगर्वी असलेला लोकप्रतिनिधी दुर्मिळ आहेच. परंतु लोकप्रतिनिधी कसा असावा असे एकच अद्वितीय उदाहरण आहे. मला स्वत:लाच त्यांच्या तत्पर आद्य कार्यवाहीचा अनुभव नुकताच आला.
 • माझ्या मुलीला Genetics या विषयावरच शिक्षण/संशोधन करावे ही तीव्र मह्त्वाकांक्षा होती.
 • तिच्या सुदैवाने तिला UK  मधील New Castle येथील विद्यापीठात त्या प्रकारच्या शिक्षणाची प्रवेशाची संधी मिळाली. तिचा BSc चा निकाल चांगला लागला, परंतु तिची Marksheet आणि Passing Certificate येण्यास अनिश्चित वेळ होणार होता, आणि जोपर्यंत तिला ही कागद पत्रे मिळणार नाहीत तो पर्यंत New Castle University तिचा प्रवेश निश्चित करणार नाहीत.
 • मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाचा अवाका कश्याप्रकारचा आहे हे कळत होतो मार्कशीट मिळण्यास किती दिवस लागतील या बाबतीत काहीच शाश्वती नव्हती.
 • मार्कशीट मिळण्यास होत असलेल्या विलंब यामुळे कदाचित पूजाचा एवढ्या नामांकित युनिवर्सिटीच्या प्रवेशाची संधी निसटते कि काय, या विचारणे संपूर्ण कुटुंबीय चिंतातूर होते.
 • पूजाची अवस्था तर फारच विचित्र झाली होती काय करायचे या विचारने ती गोंधळून गेली. आणि किरीट सोमैया अश्या उद्दात हेतूसाठी सहकार्य करणार वृत्तीची मला जाणीव होती, म्हणूनच या विषयात हस्तक्षेप करून मला मदत करावी अशी प्रामणिक विनंती मी केली.
 • त्यांनी स्वत:चा आणि त्यांच्या कार्यालयाचा फोन नंबर मला दिला. आपल्याकडील संबंधाचा योग्य वापर करून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच केवळ पूजाला तिची मार्कशीट वेळेत मिळाली. हा त्यांचा गुण माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय आहे.
 • मुंबई विद्यापीठातील महात्मा फुले भवन येथील सुरक्षारक्षक काहीकेल्या आम्हांला परीक्षा नियंत्रक यांना भेटण्यासाठी आत सोडत नव्हते.
 • मी किरीट भाई आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि ते सुद्धा सतत पाठपुरावा करत होते. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना महत्वाच्या कामाची जाणीव दिली. डॉ. विनोद पाटील सर एका मिटिंग मध्ये व्यस्थ होते. मी या गोष्टीपासून प्रभावित झालो कि, किरीट सरांच्या ऑफिस स्टाफ ने पाटील सरांच्या सहाय्यकाबरोबर बोलणे करून माझी पाटील सरांबरोबर भेट घालून दिली. आम्ही पाटीलसरांनबरोबर बोलत असताना श्री किरीट सरांचा त्यांना फोन आला व त्यांनी मार्कशीट आणि Passing Certificate देणार याची खात्री दिली.
 • अशा प्रकारची मदत मला वाटत कुणी खासदार करत असेल, आपला वेळ व शब्द खर्च करत असेल. परंतु त्यांना शिक्षणाचे महत्व व जाणीव असल्यामुळेच त्यांनी अथक प्रयत्न करून एकदाचे आवश्यक कागदपत्रे मिळवून दिली. म्हणूनच ही व्यक्ती अद्वितीय आहे.
 • प्रथमच मला कळले आपल्या डोळ्यात येणारे अश्रू केवळ दु:ख आनंदाने येत नाहीत तर ते एखाद्याने आपल्या कठीण परिस्थितीत मदत केल्यामुळे पण आदराने व कृतज्ञतेने आपोआपच येतात.

महेश कुलकर्णी

(पूजाचे वडील)